अर्जदारांची भाऊगर्दी उसळणार
By Admin | Updated: October 12, 2015 01:24 IST2015-10-12T01:24:37+5:302015-10-12T01:24:37+5:30
माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्जांची संख्या शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

अर्जदारांची भाऊगर्दी उसळणार
माळेगाव : माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्जांची संख्या शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १३ आॅक्टोबर असून उमेदवारांच्या हाती केवळ दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे सोमवार व मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची एकच भाऊगर्दी उसळणार हे निश्चित.
या निवडणुकीमध्ये अनेक आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आपले नशीब आजमावणार आहेत. एकूण ६ प्रभागांत होणाऱ्या या निवडणुकीमधून १७ सदस्यांची निवड केली जाणार आहे. सध्या सहाही वॉर्डांतून मिळून जवळपास ७७ अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे उद्या उमेदवाारी अर्जांचा शेकडा पूर्ण होणार का, हे पाहणे औचित्याचे राहणार आहे.
काही उमेदवार अर्ज भरण्याची आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात गुंतलेले पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे या दीडशेच्या आसपास अर्ज येण्याची शक्यता आहे. या वेळी सरपंचपद खुल्या गटात असल्यामुळे या गटातून अर्ज भरणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. अजून किती अर्ज दाखल होणार, अशी उत्सुकता ग्रामस्थांमध्ये शिगेला पोहोचली आहे.