‘प्लीज गो व्होट’मधून मतदारांना आवाहन

By Admin | Updated: February 15, 2017 02:40 IST2017-02-15T02:40:58+5:302017-02-15T02:40:58+5:30

शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारावर असते. योग्य निवडीसाठी

Appeal to voters in 'Please Go Vote' | ‘प्लीज गो व्होट’मधून मतदारांना आवाहन

‘प्लीज गो व्होट’मधून मतदारांना आवाहन

पुणे : शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी प्रत्येक मतदारावर असते. योग्य निवडीसाठी आणि शहराचा विकास साधण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे, यासाठी विविध माध्यमांतून जनजागृतीचे प्रयत्न केले जात आहेत. सध्याच्या काळात लोकप्रिय ट्रेंड असलेल्या रॅप साँगच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली जात असून, ‘प्लीज गो व्होट’ हे रॅप गाणे सोशल मीडियावर हिट होत आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वसामान्य मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी ‘प्लीज गो व्होट’ हा अनोखा म्युझिक व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यासाठी मराठी रॅप गाणे करण्यात आले असून, सोशल मीडियाद्वारे हा म्युझिक व्हिडिओ मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
‘प्लीज गो व्होट, बाबा प्लीज गो व्होट’ असे या गाण्याचे शब्द आहेत. रॅपच्या माध्यमातून मतदान जागृती करण्याचा हा प्रयत्न नक्कीच वेगळा ठरला आहे. प्रसिद्ध अभिनेता विजय पटवर्धन, अनिकेत वाकचौरे, प्रशांत तपस्वी, तेजस कुलकर्णी, हृषीकेश थेटे, करण खजिने, रोहित सातपुते हे कलाकार या म्युझिक व्हिडिओमध्ये आहेत. निखिल खैरे यांनी गीतलेखन, राजेश कोलन यांनी दिग्दर्शन, योगेश राजगुरू यांनी छायांकन, गंधार यांनी संगीत आणि संयोजन, निखिल ठक्कर यांनी संकलन केले आहे. तेजस गोखले, योगेश कोलन हे कार्यकारी निर्माते आहेत. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे; मात्र अनेकदा हे कर्तव्य बजावले जात नाही.

Web Title: Appeal to voters in 'Please Go Vote'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.