निर्माल्य नदीत न टाकण्याचे आवाहन
By Admin | Updated: September 29, 2015 02:13 IST2015-09-29T02:13:38+5:302015-09-29T02:13:38+5:30
मुळा-मुठा नदीच्या किनाऱ्यावर गणपतीचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना निर्माल्य नदीत न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.

निर्माल्य नदीत न टाकण्याचे आवाहन
मांजरी : मुळा-मुठा नदीच्या किनाऱ्यावर गणपतीचे विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांना निर्माल्य नदीत न टाकण्याचे
आवाहन करण्यात आले. अरुण बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेने यासंबंधी गणेशभक्तांना केलेल्या आवाहनाला प्रतिसादही चांगला मिळाला.
जलप्रदूषण काही प्रमाणात कमी करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान, हे सर्व निर्माल्य एकाच ठिकाणी गोळा करण्यात आले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, समन्वयक प्रवीण लांडगे, जयश्री तांबोळी, राहुल चांदणे, साधना पराडकर, रंजना मेमाणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)