पर्यावरणपूरक शेतीसाठी कृषिकन्येचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:13 IST2021-08-29T04:13:38+5:302021-08-29T04:13:38+5:30
शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत, जीवामृत यांचा वापर करून ते पिकांचे उत्पादन करत आहेत. शिवाय, १०० टक्के ...

पर्यावरणपूरक शेतीसाठी कृषिकन्येचे आवाहन
शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर न करता शेणखत, जीवामृत यांचा वापर करून ते पिकांचे उत्पादन करत आहेत. शिवाय, १०० टक्के ठिबक सिंचनाचा वापर करत आहे. ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पुण्यातील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्या गौरी पिंगट यांनी विषय तज्ज्ञ डॉ. एच. पी. सोनवणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. पी. डी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतिशील शेतकरी शिवाजी पिंगट यांच्या शेतीतील विविध प्रयोगाचा अभ्यास केला व इतर शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक होण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी वसंत पिंगट, किशोर पिंगट, संतोष कुंजीर, किसन पिंगट आदी उपस्थित होते.
280821\img-20210824-wa0188.jpg
बेल्हा(ता.जुन्नर)येथे कृषी कन्या पिंगट ही आधुनिक व पर्यावरण पूरक शेती करताना दिसत आहे.