अर्थसंकल्पासाठी आवाहन
By Admin | Updated: October 11, 2015 04:28 IST2015-10-11T04:28:49+5:302015-10-11T04:28:49+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतच्या खर्चाची

अर्थसंकल्पासाठी आवाहन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी दहा लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यासाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत नागरिकांना ज्या त्या क्षेत्रीय कार्यालयात लेखी कामे सुचविता येतील.
या कालावधीत आलेल्या योग्य सूचनांचा समावेश पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात केला जाणार आहे. नागरिकांनी सुचविलेल्या कामांसाठी आगामी अर्थसंकल्पात स्वतंत्रपणे तरतूद केली जाणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने २००७-०८ या आर्थिक वर्षापासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव केला जात आहे. नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. शहरातील विविध विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने व्हावीत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि विकासकामांवर लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा, या दृष्टीने सूचना मागविण्याचा उपक्रम राबविला जात आहे. (प्रतिनिधी)