शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या ग्रंथालय निधी योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 13:52 IST

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबवण्यात येतात.

ठळक मुद्देसंदर्भातील नियम अटी व अर्जाचा नमुना आरआरआरएलएफ डॉट जीओव्ही या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध दुर्मिळ ग्रंथ व दस्तावेज, ऐतिहासिक रेकॉर्ड्स आणि यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी अर्थसहाय्य

पुणे : शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या असमान निधी योजनांतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबवण्यात येतात. या योजनांसाठी २०१८-१९ साठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत हे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठवण्याचे आवाहन पुणे विभागाचे ग्रंथालय संचालक सुभाष राठोड यांनी केले आहे. सन २०१८-१९ पासून प्रतिष्ठानकडून असमान निधी योजना सुधारित करण्यात आल्या आहेत. असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना आरआरआरएलएफ डॉट जीओव्ही या प्रतिष्ठानच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ग्रंथालय सेवा देण्या-या संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार यासाठी असमान निधीतून, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोपरा विकसित करण्यासाठी, महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी, राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी, दिव्यांग वाचकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी, हस्तलिखितांचे कॉपीराईट, दुर्मिळ ग्रंथ व दस्तावेज, जुनी नियतकालिके, ऐतिहासिक रेकॉर्ड्स आणि सामग्री यांचे डिजीटायजेशन करण्यासाठी, डिजिटल माहिती सेवा विभाग प्रस्थापित करण्यासाठी तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सार्वजनिक ग्रंथालयांसाठी अर्थसहाय्य करण्यात येते.राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्ह्याच्या ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी. उपरोक्त योजनांचा लाभ घेण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा  नमुना सुधारित स्वरूपात असावा. अर्जामध्ये नमूद केलेल्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेमधील परिपूर्ण प्रस्ताव चार प्रतिंमध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दिनांक 30 नोव्हेंबरपर्यंत पाठवावेत, असे आवाहन राठोड यांनी सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.

टॅग्स :PuneपुणेlibraryवाचनालयGovernmentसरकार