शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अप्पासाहेब जगदाळे शरद पवारांच्या गटात? बारामतीत सुप्रिया सुळेंना फायदा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 15:27 IST

भेटीनंतर कार्यकर्त्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे अप्पासाहेब जगदाळेंनी सांगितले

इंदापूर  : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, तालुक्यातील दणकेबाज नेते आप्पासाहेब जगदाळे यांनी आज ( दि.१०) पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी सोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे. कार्यकर्त्यासमवेत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असे जगदाळे यांनी सांगितले आहे.   या संदर्भात लोकमत शी बोलताना जगदाळे म्हणाले की, मागील काळातच शरद पवार यांनी भेटीचे निमंत्रण दिले होते. मात्र घरात दु:खद प्रसंग घडला होता. त्यामुळे भेट घेता आली नव्हती. मात्र मागील महिन्यात आपण अजित पवार यांची ही भेट घेतली होती. आजच्या भेटीत शरद पवार यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली. इंदापूर तालुका, बारामती लोकसभा मतदार संघातील विद्यमान परिस्थितीबाबत बोलणे झाले.    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या विभागणीनंतर विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या गटात गेले. गेल्या आठवड्यात शरद पवार गटातील विधानसभा निवडणुकीचे प्रबळ दावेदार प्रवीण माने देखील देवेंद्र फडणवीस यांचे चहापान करुन अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असणा-या आप्पासाहेब जगदाळे यांना आत्ता मार्ग ख-या अर्थाने मोकळा झाला आहे. या संदर्भात विचारणा केल्यानंतर आपणास मार्ग नेहेमी मोकळाच होता. मी ज्या गोष्टी करतो त्या कधी चोरुन लपून करत नाही, असे ते म्हणाले.

आप्पासाहेब जगदाळे हे हर्षवर्धन पाटील यांचे मामा असले तरी त्यांच्यामध्ये अधूनमधून मतभेद होत असत. सन २०१९ च्या निवडणुकीआधी त्यांची दिलजमाई झाली होती. पाटील यांचा प्रचार करण्यात जगदाळे यांनी कसली ही कसर सोडली नव्हती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील विजयाच्या उंबरठ्यापर्यंत आले होते. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारांच्या कारणावरून त्या दोघांचे परत बिनसले. अजित पवारांनी साथ दिली. बाजार समितीवर जगदाळे यांची सत्ता आली. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागणीनंतर चित्र बदलले आहे. अजित पवार, आ.दत्तात्रय भरणे, प्रदीप गारटकर, प्रवीण माने हे सारे बिनीचे शिलेदार आत्ता शरद पवारांसोबत नाहीत. मात्र कार्यकर्त्यांनी पवारांकडे जाण्यास सहमती दर्शवली तर आप्पासाहेब जगदाळे व त्यांच्या पाठोपाठ त्यांचे बंधू पंचायत समिती सदस्य प्रदीप जगदाळे यांच्यामुळेच शरद पवार यांची बाजू भक्कम होणार आहे. खा. सुप्रिया सुळे यांना समर्थ साथ मिळू शकणार आहे.

टॅग्स :Puneपुणेbaramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Electionनिवडणूकmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४