शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या सुट्या संपूनही डीईएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे गेट अद्याप बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 12:55 IST

शालेय प्रशासनाने रंगकाम काढल्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या संपूनही सक्तीच्या सुटीवर घरी बसावे लागत आहे.

ठळक मुद्देऐन शाळेच्या दिवसांमध्ये होत असलेल्या या कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यतापॅरेंट टीचर असोसिएशन (पीटीए) ला देखील पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती, पालकांचे मत

पुणे : दिवाळीच्या सुट्या संपून पुण्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या; मात्र एका शाळेचे गेट विद्यार्थ्यासाठी अद्याप बंदच  आहे. शालेय प्रशासनाने  रंगकाम काढल्यामुळे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या संपूनही सक्तीच्या सुटीवर घरी बसावे लागत आहे. खरेतर हे काम उन्हाळी सुट्यांमध्ये करायला हवे होते. मात्र, ऐन शाळेच्या दिवसांमध्ये करण्यात येत असलेल्या या कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता पालकवर्गाकडून व्यक्त केली जात आहे. जूनमध्ये शाळा सुरू होताना पालकांना शालेय प्रशासनाकडून सुट्यांचा एक प्लॅनर दिला जातो. त्यामध्ये वर्षभरात मुलांना किती सुट्या दिल्या जातील हे नमूद करण्यात येते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना जे प्लॅनर देण्यात आले होते. त्यामध्ये दिवाळीनंतर ३० आॅक्टोबरला शाळा सुरू होईल, असा उल्लेख करण्यात आला आहे; मात्र विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षेच्या शेवटच्या दिवशी अचानक पालकांना शाळेतील रंगकामामुळे शाळा १३ नोव्हेंबरला सुरू होईल, असे सांगण्यात आले; मात्र शाळेत रंगकाम काढण्यासंबंधी पॅरेंट टीचर असोसिएशन (पीटीए) ला देखील पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती, असे पालकांचे म्हणणे आहे. 

 

शाळा सुरू झाल्यानंतर, गॅदरिंगचे वारे सुरू होईल. मग जानेवारी, फेब्रुवारीमध्ये युनिट टेस्ट आणि मार्चमध्ये वार्षिक परीक्षा घेतली जाईल. दुसर्‍या सत्राचा अभ्यासक्रम शाळा कसा पूर्ण करणार आहे हे पालकांना सांगण्यात आलेले नाही. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.- पालक  

 

शाळेच्या शौचालयाची दुरुस्ती, कडीकोयंडे तुटले होते. शाळेच्या वर्गातील भिंती काळ्या झाल्या होत्या. त्यामुळे नवीन दरवाजे बसविणे आणि रंगकाम करणे या गोष्टी प्रकर्षाने करणे गरजेचे होते. दोन महिन्यांपासून ही कामे सुरू आहेत. पालकांना आम्ही शाळा उशिरा सुरू होईल, असे सांगितले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी पुढील काळात काही शनिवारी विद्यार्थ्यांचा जादा वर्ग घेण्याचे नियोजन शाळा प्रशासनाने केले आहे.- श्रीमती नायडू, मुख्याध्यापिका, डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल

 

पालक-टीचर असोसिएशनला विश्वासात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दिवाळीपूर्वी विद्यार्थ्यांचे जादा वर्ग घेण्यात आले असून, शाळा सुरू झाल्यानंतरही, जादा वर्ग घेतले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही.- किरण शाळिग्राम, सदस्य, नियामक मंडळ डीईएस

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीeducationशैक्षणिक