शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या आर्थिक व्यवहारात ३०० कोटींची अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 05:05 IST

अनुराग कश्यप व तापसीची पुण्यातील एका हॉटेलात  अधिकाऱ्यांकडून गुरुवारीही चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिगदर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू, विकास बहल आदींच्या घर व कार्यालयांवरील आयकर विभागाच्या छाप्याची कारवाई गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू   आहे. आतापर्यंतच्या  त्यांच्या कंपनीची  मिळकत आणि आर्थिक व्यवहारात ३०० कोटींवर अनियमितता आढळून आली. २०११ ते २०१८ या वर्षांतील करचुकवेगिरी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अनुराग कश्यप व तापसीची पुण्यातील एका हॉटेलात  अधिकाऱ्यांकडून गुरुवारीही चौकशी करण्यात आली. त्यांचे मोबाइल व लॅपटॉप जप्त करण्यात आले. आयकर विभागाने बुधवारी    मुंबई- पुण्यासह दिल्ली, हैदराबाद आदी विविध ३० ठिकाणी  छापे मारले. त्यामध्ये दोघांसह विकास बहल,  क्वान टलेंट मॅनेजमेंट कंपनीच्या मधू मंटेना यांच्याही मालमत्तेचा  समावेश आहे. त्यांनी २०१५ मध्ये  फँटम हा चित्रपट बनविला होता. त्यांच्याशी संबंधित व्यवहारावरून  त्यांच्या घरांची आयकर अधिकारी झाडाझडती घेत आहेत. 

जवळपास ३०० कोटींचा हिशोब त्यांनी आयकर विभागाकडे सादर केलेला नाही. त्याचबरोबर तापसीला व्यवहारात ५ कोटी रोकड मिळाली होती, असे सांगण्यात आले.अनुराग कश्यप, तापसी पन्नूने केंद्र सरकारच्या  अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात  नेहमी उघडपणे भूमिका मांडली आहे. एनआरसी, सीएएविरोधी कायदा, शेतकऱ्याचे आंदोलनबाबत ट्वीट करून भूमिका मांडली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची  टीका विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. 

पुण्यात चौकशीपुणे : फॅन्टम फिल्म कंपनीच्या कथित कर चुकवेगिरी प्रकरणामध्ये बुधवारी सकाळपासून दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चौकशी सुरू आहे. ही चौकशी शुक्रवारीही सुरू राहण्याची शक्यता प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली. दोघेही चित्रीकरणासाठी पुण्यात आलेले आहेत. त्यांचा हिंजवडी परिसरातील हॉटेलमध्ये मुक्काम आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या हॉटेलमध्येच त्यांना गाठत चौकशी करण्यास सुरुवात केली. 

टॅग्स :Taapsee Pannuतापसी पन्नूAnurag Kashyapअनुराग कश्यप