पुणे : गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी निगडी येथील घरातून अटक केली़. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा पोलीस शोध घेत होते़. त्या नातेवाईकांच्या घरी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा घालून त्यांना ताब्यात घेतले़. डीएसके यांचे मोठे भाऊ मकरंद सखाराम कुलकर्णी, त्यांची मुलगी शिल्पा मकरंद कुलकर्णी, स्वरुपा मकरंद कुलकर्णी, बहीण अश्विनी संजय देशपांडे, हेमंती कुलकर्णी यांची बहीण अनुराधा रामचंद्र पुरंदरे आणि शिरीष कुलकर्णी यांची पत्नी तत्वी शिरीष कुलकर्णी यांचा जमीन खरेदी विक्रीमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांंना आरोपी केले आहे़. या सर्व जणांचा प्रामुख्याने ड्रिम सिटीमधील जमीन खरेदी विक्रीमध्ये सहभाग होता़. त्यांच्या नावावर ड्रिम सिटीमधील जमिनी खरेदी करण्यात आल्या़. त्यानंतर त्या डीएसकेडीएल या पब्लिक लि़ कंपनीला दीड ते दोन पट जादा भावाने विकण्यात आल्या़.आर्थिक गुन्हे शाखेने भावाचे जावई केदार वांजपे, मुलगी सई वांजपे, तसेच कंपनीतील महत्वाचे अधिकारी धनंजय पाचपोर, फायनान्स विभाग प्रमुख विनयकुमार बडगंडे यांना अटक केली होती़. त्यानंतर डीएसके यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु होता़. त्यांचे मोबाईल बंद असल्याने त्यांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश येत नव्हते़.
डीएसके यांच्या मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:09 IST
गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी निगडी येथील घरातून अटक केली़.
डीएसके यांच्या मेहुणी अनुराधा पुरंदरे यांना अटक
ठळक मुद्देनातेवाईकांचा जमीन खरेदी विक्रीमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न