वैद्यकीय अधिकारी असूनही रुग्णांची ॲंटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:08 IST2021-06-21T04:08:42+5:302021-06-21T04:08:42+5:30
दैनंदिन उपचार, रुग्णांशी संवाद याबरोबरच देवकाते स्वतःहून रुग्णांचे प्राणायाम व योगा घेत आहेत. आतापर्यंत या सेंटरमध्ये १८६ रुग्ण दाखल ...

वैद्यकीय अधिकारी असूनही रुग्णांची ॲंटिजन टेस्ट
दैनंदिन उपचार, रुग्णांशी संवाद याबरोबरच देवकाते स्वतःहून रुग्णांचे प्राणायाम व योगा घेत आहेत. आतापर्यंत या सेंटरमध्ये १८६ रुग्ण दाखल झाले आहे. तर १३० पेशंट बरे झाले आहेत. ३० पेशंट सध्या उपचार घेत आहेत. २६ रुग्णांना दुसऱ्या दवाखानाकडे दाखल केले आहेत. शासनाने हंगामी स्वरुपात त्यांची या सेंटरवर नेमणूक केली आहे. थोड्याच दिवसांमध्ये त्या आपल्या कामातून परिसरामध्ये कौतुकास पात्र ठरत आहेत. यासंदर्भात कविता देवकाते म्हणाल्या की, ऐरोली येथील परळीकर हॉस्पिटलमध्ये तीन वर्षे सेवा करताना फक्त एकच सुट्टी घेतली होती. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानताना रुग्णाची सेवा करताना अत्यानंद मिळतो.
फोटो : केडगाव येथे पीपीई किट घालून ॲंटिजन टेस्ट घेताना डॉक्टर कविता देवकाते