शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

संसर्गानंतरही अ‍ॅँटिबॉडी चाचणी येऊ शकते निगेटिव्ह; केवळ चाचणीवर अवलंबून न राहण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 04:08 IST

चाचणी निगेटिव्ह आली, याचा अर्थ संसर्ग झालेला नाही, असा होत नसल्याचे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

- राजानंद मोरेपुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन गेला आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी अँटिबॉडी चाचणीचा आग्रह धरला जातो. पण संसर्ग होऊन गेला तरी अनेकांमध्ये चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे चाचणीत कळून येतील इतपत अँटिबॉडी तयार झालेल्या नसतात. चाचणी निगेटिव्ह आली, याचा अर्थ संसर्ग झालेला नाही, असा होत नसल्याचे बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयाचे उपअधिष्ठाता, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.प्रश्न : अँटिबॉडी तयार झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होऊ शकतो का?अँटिबॉडीज दर २१ दिवसंनंतर घातांकीय पद्धतीने कमी होत जातात. ही प्रक्रिया होताना कोरोना विषाणूंना ओळखणाऱ्या ‘मेमरी सेल्स’ तयार होतात. काही दिवसांनी कोरोना विषाणूने आपल्या शरीरात प्रवेश केल्यास या पेशी कोरोना विषाणूंना जलदरीतीने ओळखून त्यांना मारून टाकतात. त्यामुळे पुन्हा संसर्ग होऊ शकत नाही.प्रश्न : कोरोना चाचणीप्रमाणेच अँटिबॉडी चाचणी करावी का?अँटिबॉडी चाचणी केली तरी त्याचा फायदा होईलच असे नाही. कारण अँटिबॉडीजचे प्रमाण कमी असल्यास चाचणीमध्ये ते कळत नाही. त्यामुळे चाचणी निगेटिव्ह येऊ शकते. याचा अर्थ अद्याप कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला नाही, असा होत नाही.प्रश्न : अँटिबॉडीज चाचणी कशी केली जाते?आपल्याकडे अँटिबॉडीजचे प्रमाण किती आहे, हेच प्रामुख्याने मोजले जाते. पण या अँटिबॉडीज किती सक्षम आहेत, हे पाहण्यासाठी ‘न्युट्रलायझेशन’ ही चाचणी केली जाते. ही चाचणी क्लिष्ट असल्याने काही ठरावीक ठिकाणीच उपलब्ध आहे.प्रश्न : अँटिबॉडीज तयार होणे म्हणजे काय?विषाणूंना ओळखणाºया पांढºया रक्तपेशीतील विशिष्ट पेशी ज्यांना ‘हेल्पर टी सेल्स किंवा टी सेल्स किंवा सीडी ४ सेल्स’ म्हटले जाते, त्या आपले कार्य सुरू करतात व ‘सीडी ८’ या विषाणू मारणाºया पेशींना उत्तेजित करतात. या पेशी विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींना मारतात. यामुळे विषाणूंची वाढ रोखण्यासाठी मदत होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे