पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच
By Admin | Updated: January 15, 2016 04:10 IST2016-01-15T04:10:45+5:302016-01-15T04:10:45+5:30
जमावाने हल्ला केल्यानंतरही न डगमगता पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आज (गुरुवारी) पौंड रस्ता परिसरात दिवसभर कारवाई केली. उलट, या वेळी या विभागाबरोबर

पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहीम सुरूच
पुणे : जमावाने हल्ला केल्यानंतरही न डगमगता पालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आज (गुरुवारी) पौंड रस्ता परिसरात दिवसभर कारवाई केली. उलट, या वेळी या विभागाबरोबर बांधकाम विभाग व आकाशचिन्ह विभागही सहभागी झाले व त्यांनी अनधिकृत बांधकामे व फलक काढून टाकले. कर्वे रस्ता, डीपी रस्ता येथे ही कारवाई करण्यात आली.
येरवड्यात कारवाई करताना पालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्यावर हल्ला झाला, त्याच वेळी आयुक्त कुणाल कुमार यांनी अशा हल्ल्याने पालिकेची मोहीम थांबणार नाही, असे निक्षून सांगितले व त्याच दिवशी स्वत: उभे राहून कारवाई पूर्ण करून घेतली. त्यानंतर मोहीम थंडावेल, ही अनेकांची अपेक्षा पालिका अधिकाऱ्यांनी फोल ठरवली. कोथरूड विभागातील कारवाईत आज पालिकेचे अनेक अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. एकूण २० चौरस फूट क्षेत्र यात मोकळे झाले. अनेक व्यावसायिकांचे मोठेमोठे अनधिकृत फ्लेक्स, फलक काढून टाकण्यात आले. जेसीबी यंत्राचाही वापर करण्यात आला, अशी माहिती कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत भोसेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)