नीरा अपघातातील दुसऱ्या महिलेचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:10 IST2021-04-14T04:10:35+5:302021-04-14T04:10:35+5:30

१ एप्रिलच्या अपघातातील एक महिला वैशाली संजय काशीद (वय ४२) यांचा उपचारा दरम्यान दि. ४ रोजी मृत्यू झाला होता. ...

Another woman also died in the Nira accident | नीरा अपघातातील दुसऱ्या महिलेचाही मृत्यू

नीरा अपघातातील दुसऱ्या महिलेचाही मृत्यू

१ एप्रिलच्या अपघातातील एक महिला वैशाली संजय काशीद (वय ४२) यांचा उपचारा दरम्यान दि. ४ रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घातपाताच्या शक्यतेने तपास सुरु केला. काल मंगळवार दि. १३ दुसरी महिला सुनीता बाळनाथ मोराळे (वय ३६) यांचाही लोणंदच्या खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ज्या व्यक्तीसाठी घडवून आणला होता ती महिला आज मृत्यू पावली.

मोराळे यांच्या नातेवाईकांनी तक्रार केली की, सुनीता मोराळे व नीरेतील किरण जेधे यांचे दीड ते दोन वर्षापासून विवाहबाह्य संबंध होते व त्यामधून त्या दोघांचे वाद होत होते. म्हणून सुनीता मोराळे यांना मारण्याचा कट किरण जेधे यांनी रणजीत जेधे (रा. नीरा) व संकेत राजू होले (रा. गोपाळवाडी ता. दौंड) या दोघा आरोपींसोबत केल्याची तक्रार दिलेली आहे. तांत्रिक पुरावा व साक्षीदारांच्या जबान्या वरून किरण जेधे व संकेत होले यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असल्याचे सोमवारी जेजुरी पोलिसांनी सांगितले होते.

Web Title: Another woman also died in the Nira accident