शहरात आणखी एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By Admin | Updated: September 13, 2014 05:21 IST2014-09-13T05:21:51+5:302014-09-13T05:21:51+5:30

शहरात डेंग्यूबरोबरच स्वाइन फ्लूचे मृत्युसत्र सुरूच असून, अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील एका ३७ वर्षीय युवकाचा आज स्वाइन फ्लूने मृत्यू झाला

Another swine flu death in the city | शहरात आणखी एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

शहरात आणखी एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

पुणे : शहरात डेंग्यूबरोबरच स्वाइन फ्लूचे मृत्युसत्र सुरूच असून, अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील एका ३७ वर्षीय युवकाचा आज स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरातील स्वाइन फ्लूचा हा पाचवा मृत्यू आहे. रमेश आसाराम भिटे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. रमेश यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
रमेश यांना 3 सप्टेंबरपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, त्रास कमी होत नसल्याने त्यांना ४ सप्टेंबर रोजी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ९ सप्टेंबरला रमेश यांना स्वाइन फ्लू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले. आज दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.(प्रतिनिधी)

Web Title: Another swine flu death in the city