महिलेच्या खूनप्रकरणी आणखी एकाला अटक
By Admin | Updated: February 21, 2017 03:03 IST2017-02-21T03:03:37+5:302017-02-21T03:03:37+5:30
दुसऱ्या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी दिल्यामुळे मेहुणीचे अपहरण करून तिचा खून प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी सोमवारी आणखी

महिलेच्या खूनप्रकरणी आणखी एकाला अटक
पुणे : दुसऱ्या लग्नाचे बिंग फोडण्याची धमकी दिल्यामुळे मेहुणीचे अपहरण करून तिचा खून प्रकरणात स्वारगेट पोलिसांनी सोमवारी आणखी एकाला अटक केली आहे. बालाजी बाबूराव चोरघडे (वय ३४, खांंडवी, उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. चोरघडे याला २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी गोविंद अर्जुन ताकभाते (वय २९), त्याची आई गौळण अर्जुन ताकभाते (वय ५२) आणि सागर पोपट मुळीक (वय २१) यांच्या पोलीस कोठडीतदेखील २२
फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला निरीक्षणगृहात पाठविण्यात आले आहे, तर आणखी एकाच्याविरोधात गुन्ह्यात दाखल करण्यात आला आहे.
अश्विनी शिवकुमार परदेशी (वय ३५, रा. मार्केट यार्ड) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून तिची बहीण आणि गोविंद याची पहिली पत्नी स्वाती (वय २७, रा. मार्केट यार्ड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी घडली होती. घटनेला दीड महिना उलटून गेल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला आहे. (प्रतिनिधी)