पुरंदरमध्ये आणखी एकाचा निर्घृण खून
By Admin | Updated: February 19, 2015 23:31 IST2015-02-19T23:31:39+5:302015-02-19T23:31:39+5:30
साकुर्डे येथील शेतकऱ्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच, आज नीरानजीक पिंपरे खुर्द गावाच्या थोपटेवाडी येथे सकाळी एका शेतकऱ्याचा डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली.

पुरंदरमध्ये आणखी एकाचा निर्घृण खून
जेजुरी : साकुर्डे येथील शेतकऱ्याच्या खुनाची घटना ताजी असतानाच, आज नीरानजीक पिंपरे खुर्द गावाच्या थोपटेवाडी येथे सकाळी एका शेतकऱ्याचा डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याची घटना घडली. पोपट लव्हबा थोपटे (वय ५७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मुलगा राहुल थोपटे यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी ६ च्या सुमारास मयत शेतकरी गावाबाहेर एक कि.मी. अंतरावरील माळरानावर मोकळ्या जागेत प्रातर्विधीसाठी गेला होता. या वेळी मागच्या बाजूने या शेतकऱ्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने अनेक वार केले. यात त्याची कवटी फुटून मेंदू बाहेर आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मारहाण होत असताना त्याने आरडाओरडा केला, तेव्हा गावातील काही इसमांनी मारहाण करणारी व्यक्ती पळून जाताना पाहिली.
घटनेचे वृत्त कळताच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने परिसराची कसून तपासणी केली, मात्र गुन्हेगार सापडू शकला नाही. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी मोरे, यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. घटनास्थळी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ तसेच पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधिकारी आले होते. जेजुरी पोलिसांनी भा.दं.वि. ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील आरोपीबाबत धागेदोरे हाती आले असून, तपासासाठी चार पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच आरोपीला ताब्यात घेवू असे सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी सांगितले. (वार्ताहर)
पोलिसांपुढे आव्हान
४गेल्या ७ फेब्रुवारीला साकुर्डे येथेही अशाच प्रकारची घटना घडली होती. १५ दिवसांतील ही दुसरी घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दोन्ही घटनांमुळे जेजुरी पोलिसांसमोर हे एक मोठे आव्हानच बनले आहे.
४साकुर्डे येथील घटनेबाबत अजूनही पोलिसांना कसलेच धागेदोरे मिळालेले नाहीत. मात्र, साकुर्डे येथील खुनाचा तपास अंतिम टप्प्यात आला असून, लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल, असेही स.पो.नि. शेळके यांनी सांगितले.