पूजा चव्हाण प्रकरणी लष्कर न्यायालयात आणखी एक खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:57+5:302021-03-04T04:17:57+5:30
करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने न्यायालयात धाव घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने याबाबत न्यायालयात ...

पूजा चव्हाण प्रकरणी लष्कर न्यायालयात आणखी एक खटला
करावा, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने न्यायालयात धाव घेतली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीने याबाबत न्यायालयात फिर्याद दाखल केली होती. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर हा खटला दाखल झाला आहे. यापूर्वी लीगल जस्टिस सोसायटीतर्फे अँड. भक्ती पांढरे यांनी देखील फिर्याद दिली होती. त्यानुसार त्यांचाही खटला लष्कर न्यायालयात दाखल केला आहे. या दोन्ही अर्जांवर दि. 5 मार्च रोजी निकाल होणार आहे. या दोन्हीही खटल्यात कोणतीही व्यक्ती किंवा संशयिताचे नाव दिलेले नाही. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकतर््यांनी तक्रार दाखल करूनही सात दिवस झाले. पोलिसांना कुणीही तक्रार दाखल करण्याची वाट पाहाण्याची गरज नाही. पोलीस सुमोटो देखील दाखल करू शकतात. मात्र ते कुणाच्या आदेशाची वाट पाहात आहेत ते कळत नाही. मंगळवारी (दि.2)आमच्या अर्जावर युक्तीवाद झाला. न्यायालयाने आमचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानुसार न्यायालयात खटला दाखल झाला आहे. याबाबतची पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार असल्याची माहिती भाजपा वकील आघाडीच्या अध्यक्ष अँड. ईशानी जोशी यांनी दिली.
-------------------------------
समाजाची बदनामी थांबून न्याय द्या
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पूजाच्या चारित्र्याचे हनन होत असून काही घटकांकडून बंजारा समाजाची बदनामी करण्यात येत आहे. त्यांविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करत समस्त समाजाला न्याय देण्याची मागणी अँड. रमेश राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, याप्रकरणात वेळोवेळी कायद्याचे उल्लंघन करणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावेत अशी तक्रार वानवडी पोलिस ठाण्यात दिली असल्याचेही राठोड यांनी सांगितले.
-----------------------------------------------