शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यासह पत्नीविरोधात बारामतीत आणखी एक गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 15:51 IST

तीन आडतदारांच्या नावे ८ लाख ६३ हजारांचा दाखविला बनावट व्यवहार 

बारामती : बारामतीतील तीन आडतदारांच्या नावच्या बनावट पावत्या एसीबीकडे सादर करत त्याद्वारे सुमारे आठ लाख ६३ हजारांचे बनावट व्यवहार दाखविल्याप्रकरणी नगररचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत जगन्नाथ नाझीरकर व त्यांच्या पत्नी  संगीता हनुमंत नाझीरकर यांच्या विरोधात  बारामती शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत शहर पोलिस ठाण्यात संदीप वसंतराव गदादे (रा. मळद, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली.त्यानुसार  बारामतीत संजय वसंतराव गदादे व संदीप वसंतराव गदादे हे फळ व भाजीपाल्याचे कमिशन एजंट म्हणून काम करतात. निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांची  उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. त्यानुसार विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. चौकशी सुरु असताना बारामतीतील तीन आडतदारांकडील पावत्या नाझीरकर यांनी सादर केल्या होत्या. एसीबीकडून चौकशीकामी बोलावण्यात आल्यानंतर गदादे हे दोन महिन्यांपूर्वी  पुणे कार्यालयात गेले. यावेळी सन २०१२-१३ या कालावधीत त्यांच्या आडत दुकानाच्या ३८ बोगस पावत्या नाझीरकर यांनी एसीबीकडे सादर केल्याचे दिसून आले. या पावत्यांवर इंग्रजीत आकडे मांडलेले होते. शिवाय बाजार समितीचा कोणताही शिक्का ,तसेच आडत दुकानदारांच्या सह्या नव्हत्या. गदादे यांच्याकडे मिरची, काकडी, दोडका, फ्लॉवर आदी ६ लाख ७७ हजार रुपयांचा शेतमाल विक्री केल्याचे या पावत्यांवरून दाखविण्यात आले होते. परंतु नाझीरकर यांच्याकडून कोणताही शेतमाल गदादे यांनी खरेदी केलेला नाही. तसेच ते त्यांना ओळखतही नसल्याची माहिती पुढे आली आहे.

गदादे यांनी एसीबी कार्यालयात अधिक माहिती घेतली असता, बारामतीतील केशवराव बाबुराव मचाले आणि सुनील बबनराव बनकर या आडतदारांकडील अशाच बनावट पावत्या जोडण्यात आल्याचे दिसून आले. त्यात या दोघांकडे सोयाबीन, शेवगा, वांगी विक्री केल्याचे तर दाखविण्यात आले होते. मचाले यांच्याकडील तीन पावत्यांवर १ लाख ४९ हजार ५४५ तर तर बनकर यांच्याकडील १९ पावत्यांद्वारे ३६, ४७७रुपयांचा शेतमाल विकल्याचे दाखवण्यात आले होते. या तिघांची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी नाझीरकर दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

यामुळे उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती  बाळगल्याप्रकरणी  गुन्ह्यात अटक असलेल्या नाझीरकर यांच्यावर दाखल गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे दिसुन येत आहे. गेल्या महिन्यातच त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने महाबळेश्वरातून अटक केली आहे.  नाझीरकर व त्यांच्या पत्नी संगीता  यांच्या विरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात यापूर्वी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  

————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी