शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Chandni Chauk Pune: चांदणी चौकात सहा महिन्यांत उभारला जाणार दुसरा पूल

By नितीश गोवंडे | Updated: October 3, 2022 15:42 IST

या उड्डाण पुलाच्या प्रकल्पामुळे पुण्याहून कोथरूड मार्गे, मुळशी, हिंजवडी, सातारा, मुंबई, पाषाण, बावधन कडे ये-जा करण्यासाठी सोपे होणार आहे....

पुणे : वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी आणि राष्ट्रीय महामार्गावरील लेन वाढवण्यासाठी शनिवारी (१ ऑक्टोबर) मध्यरात्री एक वाजता चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला. याठिकाणी येत्या सहा महिन्यात ११२ मीटरचा नवीन पूल देखील बांधला जाणार आहे. सोमवारी महामार्गावरील लेन वाढवण्यासाठी दुपारी १२ आणि २ वाजता बाजूचा खडक ब्लास्टद्वारे फोडण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूची वाहतुक २० मिनीटांसाठी थांबवण्यात आली होती.

महामार्ग प्राधिकरणाने पूल पाडल्यानंतर लगेचच दोन सर्व्हिस रोड बनवण्याचे काम हाती घेतले असून, येत्या ७ दिवसात हे रोड पूर्ण होतील अशी माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ३९७ कोटी रुपयांच्या चांदणी चौकातील उड्डाणपुल प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून भूसंपादनाच्या कामामुळे उर्वरीत काम रखडले आहे. ११२ मीटरच्या पूलासाठी ९ ठिकाणच्या जागा मिळणे गरजेचे आहे. ९ पैकी ७ ठिकाणच्या जागा मिळाल्या असून उर्वरीत दोन जागा वेळेत हस्तांतरीत झाल्या तर पूलाचे काम येत्या मार्च २०२३ पर्यंत होईल अशी आशा एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना आहे.

सोमवारी महामार्गावरील लेन वाढवण्यासाठी बाजूच्या खडकांवर ब्लास्ट करण्यात आला. आज मंगळवारी देखील अशाचप्रकारे दोन ब्लास्ट केले जाणार असून सहा महिन्यात या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुढील अनेक वर्षांपर्यंत मिटणार आहे. या उड्डाण पुलाच्या प्रकल्पामुळे पुण्याहून कोथरूड मार्गे, मुळशी, हिंजवडी, सातारा, मुंबई, पाषाण, बावधन कडे ये-जा करण्यासाठी सोपे होणार आहे.

ठळकपणे दिशादर्शक फलक असणे गरजेचे...चांदणी चौकातील उड्डाणपुल प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण नव्याने सुरू झालेल्या रस्त्यांवरून ये-जा करताना वाहन धारकांना दिशादर्शक फलक दिसतील असे ठळकपणे न लावले गेल्याने अडचण होत आहे. यामुळे नेमके कुठून-कुठे जायचे असा संभ्रम वाहन चालकांना होत आहे. यावेळी शहराबाहेरून आलेल्या वाहन चालकाला मोठी अडचण भेडसावत असल्याने ठळकपणे दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड