‘त्या’ नराधमाला आणखी ५ वर्षांची शिक्षा
By Admin | Updated: October 5, 2016 01:43 IST2016-10-05T01:43:02+5:302016-10-05T01:43:02+5:30
तिसरीतील मतिमंद आणि ६० टक्के अपंग मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन अतिप्रसंग करणारा आरोपी महादेव

‘त्या’ नराधमाला आणखी ५ वर्षांची शिक्षा
राजगुरुनगर : तिसरीतील मतिमंद आणि ६० टक्के अपंग मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन अतिप्रसंग करणारा आरोपी महादेव आसराजी बोऱ्हाडे (वय ५४, मूळ रा. बालम टाकळी, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) याला राजगुरुनगरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली आज ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
अणे (ता. जुन्नर) येथील भाऊसाहेब बोरा अपंगकल्याण केंद्रातील गाजलेल्या बलात्कार प्रकरणातील तिसऱ्याही खटल्याचा आज निकाल लागला. या बलात्कार प्रकरणातील दोन अपंग मुलींसंदर्भातल्या खटल्यांचे निकाल गेल्या आठवड्यात लागले होते. याच आरोपीला बलात्काराच्या एका खटल्यात जन्मठेप व दुसऱ्या खटल्यात १० वर्षे सक्तमजुरी, अशा शिक्षा सुनावलेल्या आहेत. भाऊसाहेब बोरा अपंगकल्याण केंद्रात पाचवीतील आणि सातवीतील अपंग मुलींवर बलात्कार केला होता. (वार्ताहर)