आणखी १६५ बस दाखल
By Admin | Updated: December 27, 2014 05:05 IST2014-12-27T05:05:54+5:302014-12-27T05:05:54+5:30
पीएमपीच्या बंद पडणाऱ्या बसची वाढती संख्या लक्षात घेऊन पीएमपीच्या संचालक मंडळाने नवीन १६५ बसखरेदीस शुक्रवारी मान्यता दिली आहे

आणखी १६५ बस दाखल
पुणे : पीएमपीच्या बंद पडणाऱ्या बसची वाढती संख्या लक्षात घेऊन पीएमपीच्या संचालक मंडळाने नवीन १६५ बसखरेदीस शुक्रवारी मान्यता दिली आहे. दुरुस्तीअभावी ६०० बस बंद असताना नवीन १६५ बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीस पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी, महापौर दत्तात्रय धनकवडे, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, पिंपरी-चिंचवड स्थायी समितीचे अध्यक्ष महेश लांडगे, संचालक प्रशांत जगताप उपस्थित होते.
पीएमपीकडे सध्या १३०० बस आहेत. त्यामध्ये आता १६५ बसची भर पडणार आहे. पीएमपीच्या अनेक बस रस्त्यावरच बंद पडत असल्याने विविध मार्गावरून धावणाऱ्या बसचे वेळापत्रक कोलमडते. प्रवाशांची संख्या आणि रस्त्यावर धावणाऱ्या बसची संख्या यांचे प्रमाण व्यस्त असल्याने पीएमपीची प्रवासीसंख्या वेगाने घटत आहे. पीएमपीऐवजी खासगी वाहनांचा आधार प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात घेतला जाऊ लागला आहे. बस बंद असल्याने अनेक बसचालक व कंडक्टर यांना काम उपलब्ध नाही. काम मिळावे म्हणून काही दिवसांपूर्वीच कामगार संघटनांकडून आंदोलन छेडण्यात आले होते. नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे. बे्रक फेल, ब्रेक
डाऊन, रस्त्यांमध्ये गाडी बंद
पडणे आदी प्रकारांमुळेही
प्रवाशांकडून पीएमपीकडे पाठ फिरवली जात आहे. (प्रतिनिधी)