विद्यापीठाच्या पुरस्कारांची घोषणा
By Admin | Updated: January 29, 2017 04:31 IST2017-01-29T04:31:15+5:302017-01-29T04:31:15+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे यावर्षीचे उत्कृष्ट प्राचार्य, संस्था, शिक्षक, महाविद्यालय व विभाग पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार

विद्यापीठाच्या पुरस्कारांची घोषणा
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे यावर्षीचे उत्कृष्ट प्राचार्य, संस्था, शिक्षक, महाविद्यालय व विभाग पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार शहरी भागातून चंद्रकांत रावळ व डॉ. संजय सावंत यांना जाहीर झाला आहे. हे सर्व पुरस्कार पुढील महिन्यात विद्यापीठाच्या वर्धापनदिनी प्रदान केले जाणार आहेत.
वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाकडून दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाकडून यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. उत्कृष्ट विद्यापीठ विभागासाठीचा पुरस्कार स्कूल आॅफ एनर्जी स्टडीज आणि विधी विभागाला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट प्राचार्य म्हणून शहरी भागातून सिंहगड संस्थेच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय सावंत, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रावळ, ग्रामीण भागातून नाशिकमधील मातोश्री कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. गजानन खराटे व बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांना
जाहीर झाला.
उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शहरी भागासाठी दिघीच्या आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, पंचवटीच्या व्यंकटराव हिरे महाविद्यालय आणि पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांना,
तर ग्रामीण विभागातून
अहमदनगरच्या विखे पाटील फाउंडेशनचे इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस मॅनेजमेंट अॅण्ड रूरल डेव्हलपमेंट आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयास जाहीर झाला आहे.
नावीन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी पुरस्कार विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे डॉ. दीपाली मालखेडे, विधी विभागाचे डॉ. तम्मा शास्त्री यांना, तर शहरी भागातून एमआयटी आॅफ फार्मसीचे डॉ. अल्पना कुलकर्णी, गणेशखिंडच्या मॉडर्न महाविद्यालयाचे डॉ. रवींद्र क्षीरसागर, ग्रामीण भागातून अवसरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. दिलीप पानगव्हाणे आणि वाघोलीच्या जैन संघटनेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. संजय गायकवाड यांना जाहीर झाला आहे.
(प्रतिनिधी)
मॉडर्न महाविद्यालयाला पुरस्कार
उत्कृष्ट शिक्षक म्हणून शहरी
विभागातून सीओईपीचे डॉ. मोहन खोंड, नाशिकच्या व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचे डॉ. रेशम भल्ला,
ग्रामीण भागातून नाशिकच्या
मातोश्री कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे
डॉ. वर्षा पाटील आणि भारतीय
जैन संघटनेच्या महाविद्यालयाचे डॉ. जोतीराम मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
फेलिसिटेशन आॅफ टिचर म्हणून वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. दिगंबर मोकाट आणि गणेशखिंडच्या मॉडर्न महाविद्यालयाला पुरस्कार दिला जाणार आहे.