एमआयटीच्या भारत अस्मिता पुरस्काराची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:42+5:302021-02-05T05:01:42+5:30
भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कराचे यंदाचे १७ वे वर्ष असून यंदा हार्वेड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत दातार, लडाख येथील ...

एमआयटीच्या भारत अस्मिता पुरस्काराची घोषणा
भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कराचे यंदाचे १७ वे वर्ष असून यंदा हार्वेड बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत दातार, लडाख येथील खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल, बॉयोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ. किरण मुजुमदार शॉ, किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे आणि प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या व लेखिका सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. तसेच यूएसए येथील जागतिक कीर्तीचे व्यावसायिक सल्लागार, लेखक आणि विचारवंत डॉ. राम चरण यांना भारत अस्मिता विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
प्रत्येकी सव्वा लाख रुपये ,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर,ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.