मेडिकल प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

By Admin | Updated: June 13, 2014 05:05 IST2014-06-13T05:05:43+5:302014-06-13T05:05:43+5:30

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले

Announcement of medical admission schedule | मेडिकल प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

मेडिकल प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

पुणे : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयातर्फे (डीएमईआर) २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना येत्या १६ जूनपासून प्रवेशाबाबतची माहिती डीएमईआरच्या संकेतस्थळावरून डाऊन लोड करून घेता येणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांकडून प्रवेशाचे पसंतीक्रम अर्ज (प्रेफरन्स फॉर्म) डीएमईआरतर्फे निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांवरच भरून घेतला जाणार आहे.
डीएमईआरतर्फे मेडिकल सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता मेडिकल अभ्यासक्रमाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या, महानगरपालिकेच्या आणि राज्य शासनाच्या अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशाबाबतची विस्तृत माहिती ६६६.ेिी१.ङ्म१ॅ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, पुणे, मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथील चार विभागांतील केंद्रांवरून ही प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. मुंबई येथील ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज, पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेज, औरंगाबाद व नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज भरता व जमा करता येणार आहेत. मुंबई येथील केंद्रावर मुंबई शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील विद्यार्थ्यांना प्रवेशअर्ज जमा करता येतील.
तर, पुण्यातील केंद्रावर पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे येथील विद्यार्थी अर्ज भरू शकतील. औरंगाबादमधील केंद्रावर नांदेड, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, परभणी, जळगाव, बुलढाण्यातील विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात नागपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारदरा, गोंदिया येथील विद्यार्थ्यांना अर्ज जमा करता येईल.(प्रतिनिधी)

Web Title: Announcement of medical admission schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.