शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

10 वी अन् 12 वी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या कधी आहे परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 02:13 IST

दहावी-बारावी २०१८-१९ : राज्य माध्यमिक मंडळाची माहिती

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेतल्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१९ या कालावधीमध्ये पार पडेल, तर बारावीची लेखी परीक्षा १ ते २२ मार्च २०१९ या कालावधीमध्ये होणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.

शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दहावी व बारावीचे विद्यार्थी, शिक्षक यांना अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जावे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी व्हावा, यादृष्टीने संभाव्य वेळापत्रक राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आल्याची माहिती सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. मंडळाकडून संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे संभाव्य आहे, परीक्षेपूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळांकडून जे छापील वेळापत्रक पाठविले जाईल ते अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घेणे आवश्यक आहे. इतर क्लासेस यांनी छपाई केलेले, सोशल मीडियावरून प्रसारित झालेले वेळापत्रक विद्यार्थ्यांनी ग्राह्य धरू नये, असे आवाहन भोसले यांनी केले आहे. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा यांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा व महाविद्यालयांना कळविले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून १० वीकरिता पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनर्परीक्षार्थ्यांकरिता अंतिम संधी असलेल्या जुन्या अभ्यासक्रमांचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले आहे, असे मंडळाकडून स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSSC Results 2018दहावी निकाल २०१८