ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचा वर्धापन दिन रक्तदान शिबिराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:25+5:302021-01-08T04:31:25+5:30

ग्रुपच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ...

Anniversary of Gram Swachhta Abhiyan Group with blood donation camp | ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचा वर्धापन दिन रक्तदान शिबिराने

ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचा वर्धापन दिन रक्तदान शिबिराने

ग्रुपच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप व प्रादेशिक रक्त पेढी ससूनच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन महात्मा गांधी विद्यालयातील रवींद्र कला मंदिर सभागृहात रविवारी करण्यात आले होते.

याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्त्या छाया महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच डॉ. मणीभाई देसाई यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप गेल्या सहा वर्षांपासून उरुळी कांचन व परिसरात पर्यावरण रक्षणासाठी ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत त्यांचा सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा हा ग्रुप कार्यरत आहे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या दरम्यान उरुळी कांचन गावातून पालखी निघून गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात हा ग्रुप संपूर्ण गावाची स्वच्छता करून एक आदर्शवत काम गेल्या सहा वर्षांपासून करीत आहे. प्रत्येक रक्तदात्यास पर्यावरण पूरक तुळशीचे रोप, मास्क, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालय पुणेचे समाजसेवा अधीक्षक गणेश बर्डे, डॉ. सौरभ कुसुरकर (रक्त संकलन अधिकारी) ससून पुणे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सुनील जगताप, हवेली तालुका पत्रकारसंघाचे उपाध्यक्ष जयदीप जाधव, माजी सचिव अमोल भोसले, हनुमंत चिकणे, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, किरण वांजे, शांताराम चौधरी, महादेव काकडे, मनोज महाडीक, शैलेश गायकवाड, शैलेश बाबर, सोमनाथ बगाडे, शिवाजी नवगिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Anniversary of Gram Swachhta Abhiyan Group with blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.