शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा वर्धापनदिन : निमंत्रणपत्रिकेत महापौरांचे नाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 03:40 IST

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचा ३८ वा वर्धापनदिन ६ एप्रिलला मुंबईत राज्यस्तरावर व ८ एप्रिलला पुण्यात स्थानिक स्तरावर साजरा होत आहे. त्यासाठी पुण्यात आयोजित मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेतून महापौर मुक्ता टिळक यांचे नावच वगळण्यात आले आहे.

पुणे - गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टीचा ३८ वा वर्धापनदिन ६ एप्रिलला मुंबईत राज्यस्तरावर व ८ एप्रिलला पुण्यात स्थानिक स्तरावर साजरा होत आहे. त्यासाठी पुण्यात आयोजित मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेतून महापौर मुक्ता टिळक यांचे नावच वगळण्यात आले आहे.समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, सहयोगी खासदार संजय काकडे तसेच शहरातील आमदारांचीही नावे या पत्रिकेत नाहीत. विशेष म्हणजे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपाचेच आमदार आहेत. तरीही त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट तसेच पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांचीच नावे या पत्रिकेत आहेत. येत्या ६ एप्रिलला पक्षाचा वर्धापनदिन आहे. तो मुंबईत साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त तिथे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातून किती कार्यकर्ते जाणार, कोण नेणार याचे नियोजन करण्यासाठी झालेल्या बैठकीत आमदार व नगरसेवक यांच्यात जबाबदारी घेण्यावरून काही शाब्दिक वाद झाले होते. तसेच पक्षाच्या १०१ नगरसेवकांपैकी तब्बल ३० नगरसेवक व खासदार काकडे या बैठकीला अनुुपस्थित होते. त्यावरूनपक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे.विकासकामांची माहिती देणाऱ्या फलकांचे प्रदर्शनमुंबईतील कार्यक्रमानंतर पुण्यात ८ एप्रिलला कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. रमणबाग येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळात हा मेळावा होईल. त्या वेळी केंद्र व राज्य सरकार तसेच महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या विविध विकासकामांची माहिती देणाºया फलकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.याच कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत महापौर तसेच महापालिकेच्या अन्य पदाधिकाºयांची नावे वगळण्यात आली आहे. महापौर हे पुण्याचे प्रथम नागरिक आहेत. पक्षासाठी ही गौरवाची बाब आहे, किमान त्यांचे नावतरी टाकायला हवे होते, असे काही कार्यकर्त्यांचे मत आहे.पक्षाचे काही शिष्टाचार आहेत, ते माहिती नसलेल्यांकडून ही टीका होत आहे. हा पक्षसंघटनेचा कार्यक्रम आहे. महापौर हे पुण्याचे प्रथम नागरिक आहेत. त्यांचे नाव पक्षसंघटनेच्या कार्यक्रमात येणे योग्य नाही. केंद्रीय मंत्री, पालकमंत्री व शहराध्यक्ष यांची नावे असणे पक्षाच्या नियमाला धरून आहे.- योगेश गोगावले,शहराध्यक्ष, भाजपा

टॅग्स :BJPभाजपाPuneपुणेnewsबातम्या