शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

ऐन दिवाळीत घरात अंधार

By admin | Updated: October 23, 2014 05:12 IST

परिसरातील जवळपास अडीच हजार ग्राहकांकडे महावितरणची जवळपास एक कोटी थकबाकी असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करून तीन दिवसांत ७० लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

रावेत : बिजलीनगर कार्यालयांतर्गत बिजलीनगर, गिरीराज सोसायटी, नागसेननगर, गुरुद्वारा चौक परिसर, जाधव वस्ती, शिंदे वस्ती, चिंतामणी चौक, वेताळनगर, वाल्हेकरवाडी, आकुर्डी रेल्वे स्टेशन, उद्धवनगर, बळवंतनगर, चिंचवडेनगर, रावेत आदी भागातील थकबाकीदार ग्राहकांचे घरगुती वीजजोड तोडले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत थकबाकीदारांच्या घरी अंधार करून महावितरणाने शॉक दिला.परिसरातील जवळपास अडीच हजार ग्राहकांकडे महावितरणची जवळपास एक कोटी थकबाकी असल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करून तीन दिवसांत ७० लाख रुपयांची वसुली करण्यात आली. ५००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असणारे ४७१ आहेत. ५००० रुपयांपर्यंत थकबाकीदार असणारे २००० ग्राहक असून या सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून कारवाई करण्यात आली, अशी माहिती महावितरणच्या बिजलीनगर कार्यालयाचे मुख्य कार्यकारी अभियंता दिलीप पवार यांनी दिली. ग्राहक घरी नसताना सुद्धा महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी वीज मीटर काढून आणल्यामुळे घरी परतल्यानंतर अनेक ग्राहकांना वीज का गायब झाली हे लवकर लक्षात येत नव्हते. वीज मीटर काढून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची एकच धावपळ उडाली. थकबाकी पूर्ण भरल्याशिवाय वीजप्रवाह सुरू केला जाणार नाही अशी भूमिका महावितरण अधिकाऱ्यांंनी घेतल्यामुळे काही वेळ नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. परंतु अधिकारी ठाम असल्यामुळे नागरिकांना पूर्ण थकबाकी भरण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे नागरिक पैशाची तडजोड करून थकबाकी महावितरणाच्या कार्यालयात भरत होते. पैसे भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा कार्यालयाच्या बाहेर लागल्या होत्या. थकबाकी भरल्यानंतर लगेचच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू केला जात होता. सतत तीन दिवस झालेल्या या कारवाईमुळे महावितरणकडे ७० लाख एवढी रक्कम जमा झाली.(प्रतिनिधी)