शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक न्याय विभागाचे आण्णाभाऊ साठे व दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 19:09 IST

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात येणारे लाेकशाहीर आण्णाभाऊ साठे व पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पुणे : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात येणारे लाेकशाहीर आण्णाभाऊ साठे व पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 15 फेब्रुवारी राेजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षि विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय नाना पेठ येथे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम हाेणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

हा पुरस्कार वितरण साेहळा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हाेणार आहे. या साेहळ्याला सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडाेले, पालकमंत्री गिरीष बापट, जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, महापाैर मुक्ता टिळक आदी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील मातंग समाजाच्या विकासासाठी याेगदान देणाऱ्या मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना आण्णाभाऊ साठे पुरस्कार देण्यात येताे. दरवर्षी पंचवीस व्यक्तींना प्रत्येकी 25 हजार, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र तसेच सपत्निक गाैरव करण्यात येताे. तर सहा संस्थांना प्रत्येकी 50 हजार, पुरस्कार, शाल व श्रीफळ देऊन गाैरव करण्यात येताे. यंदा सन 2017-18 आणि 18- 19 या दाेन वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

याबराेबरच दादासाहेब गायकवाड यांचे पुराेगामी महाराष्ट्र घडविण्यामध्ये अत्यंत माेलाची कामगिरी केली आहे. त्यांचे कार्य विचाराच घेऊन राज्य शासनाकडून दरवर्षी पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे. एक व्यक्ती व एक संस्थेला प्रत्येकी 51 हजार व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.  

टॅग्स :PuneपुणेDilip Kambleदिलीप कांबळे