बाणेर पतसंस्थेला अण्णा हजारेंची भेट

By Admin | Updated: January 14, 2017 03:38 IST2017-01-14T03:38:59+5:302017-01-14T03:38:59+5:30

बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या बाणेर येथील मुख्य कार्यालयाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सदिच्छा भेट देऊन

Anna Hazare's visit to Banar Credit Society | बाणेर पतसंस्थेला अण्णा हजारेंची भेट

बाणेर पतसंस्थेला अण्णा हजारेंची भेट

पुणे : बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या बाणेर येथील मुख्य कार्यालयाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सदिच्छा भेट देऊन सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी अण्णा हजारे यांच्यासमवेत ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अभिनंदन थोरात, समीर लडकत, शिवशक्ती व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत मुरकुटे, गणेश मुरकुटे हे मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी अण्णांनी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांच्याकडून संस्थेने आजवर केलेल्या सामाजिक उपक्रमांची व संस्थेच्या वाटचालीची माहिती घेतली.
अनाथ महिलांना दरमहा ५०० रु. पेन्शन, सिंधूताई सपकाळ यांच्या संस्थेला दर वर्षी केली जाणारी मदत, जनतेच्या सेवेसाठी रुग्णवाहिका आदी संस्थेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. पतसंस्थेच्या वतीने अण्णा हजारे यांचा सन्मान संस्थापक-अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांनी केला. त्या वेळी संस्थेचे चेअरमन श्रीकांत तापकीर, संचालक योगेश काळोखे, राजश्री मुरकुटे, नामदेव भेगडे, सागर भसे, शशिकांत दर्शने, बेळगावकर दीपलक्ष्मी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तज्ज्ञ संचालक शशिकांत दर्शने यांनी आभार मानले.

Web Title: Anna Hazare's visit to Banar Credit Society