अण्णा हजारेंच्या पुतळ्याचे दहन

By Admin | Updated: January 9, 2017 02:09 IST2017-01-09T02:09:19+5:302017-01-09T02:09:19+5:30

शहरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. बारामती शहर राष्ट्रवादी युवक संघटना आणि बारामती

Anna Hazare's statue combustion | अण्णा हजारेंच्या पुतळ्याचे दहन

अण्णा हजारेंच्या पुतळ्याचे दहन

बारामती : शहरात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. बारामती शहर राष्ट्रवादी युवक संघटना आणि बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कसबा येथे हजारे यांचा पुतळा जाळला.
युवक शहराध्यक्ष अमर धुमाळ, विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद दरेकर यांनी अण्णा हजारे यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री पवारसाहेब व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या चुकीच्या आरोपांचा या वेळी तीव्र शब्दांत निषेध केला. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्यावर जर कोणी चुकीचे आरोप करीत असेल तर संघटनेचे कार्यकर्ते ते खपवून घेणार नाहीत, असा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Anna Hazare's statue combustion