शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे महामंडळ पुनरुज्जीवित होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 18:41 IST

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन होणार आहे. महामंडळाच्या परवान्याचे चारपट दंड भरुन नूतनीकरण केले आहे.

ठळक मुद्देदोन नवीन योजना आणणार : सामाजिक न्याय विभागाने परवान्याचे केले नूतनीकरणमहामंडळातील आर्थिक अनियमितता उघड झाल्यानंतर मंडळाचे कामकाज बंद येत्या महिनाभरात आणखी दोन नव्या योजनेसह महामंडळ सुरु करण्याची तयारी

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे पुनरुज्जीवन होणार आहे. महामंडळाच्या परवान्याचे चारपट दंड भरुन नूतनीकरण केले आहे. येत्या महिनाभरात आणखी दोन नव्या योजनेसह महामंडळ सुरु करण्याची तयारी सामाजिक न्याय मंत्रालयाने केली आहे. महामंडळामध्ये आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्यावर कारवाई केली आहे. सध्या ते तुरुंगात आहेत. महामंडळात २०११ ते २०१४ या कालावधीत आर्थिक अनियमितता असल्याचे आढळून आले होते. महामंडळ कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी झालेले असल्याने २०१४ साली त्याचा परवाना रद्द केला होता. तेव्हापासून महामंडळाचे कामकाज ठप्प पडले आहे. महामंडळ बंद पडणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. याप्रकरणी अनेक संस्थांनी मंत्रालयाकडे विचारणा करण्यास सुरुवात केली होती. तसेच काही संस्थांनी महामंडळ बंद करु नये, अशी मागणी देखील केली होती. त्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्रालयाने चारपट दंड भरुन परवाना सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने महामंडळ बंद पडणार असल्याच्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. याप्रकरणी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, महामंडळातील आर्थिक अनियमितता उघड झाल्यानंतर मंडळाचे कामकाज बंद होते. त्यामुळे नियमानुसार परवाना देखील निलंबित केला होता. मंत्रालयाने दंड भरुन परवाना नूतनीकरण केले आहे. त्यामुळे महामंडळातील अंशत: कामकाज सुरु झाले आहे. येत्या महिनाभरात नवीन दोन योजनांसह कामकाज सुरु करण्याचा प्रयत्न असेल. या योजनांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची औपचारिकता शिल्लक आहे. महामंडळाकडे पूर्वीचे ३०० कोटी रुपयांचे बीज भांडवल आहे. त्यात आणखी भर घालून नवीन योजना सुरु करण्याबरोबरच मंडळाचा कारभार पूर्णक्षमतेने सुरु करण्यात येईल. ---------------------अशा असतील योजना- ग्रामीण भागातील मातंग समाजाच्या कुटुंबांना १० बकरी आणि एक बोकड उदरनिर्वाहासाठी देण्यात येईल- दादासाहेब गायकवाड यांच्या नावाने भूमिहीन कुटुंबांना २ एकर जमिनीसाठी अनुदान दिले जाईल. बागाईत जमिनीसाठी ८ लाख रुपये प्रति एकर आणि जिराईत जमिन खरेदीसाठी ५ लाख रुपये प्रति एकर प्रमाणे अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.  

टॅग्स :PuneपुणेDilip Kambleदिलीप कांबळे