शाहीर दीनानाथ साठे वाटेगांवकर, दादा पासलकर यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST2021-07-18T04:09:36+5:302021-07-18T04:09:36+5:30

हा पुरस्कार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुण्यतिथीनिमित्ताने जाहीर करण्यात येत आहे. रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह, श्रीफळ असे या पुरस्काराचे ...

Anna Bhau Sathe Award to Shahir Dinanath Sathe Wategaonkar, Dada Pasalkar | शाहीर दीनानाथ साठे वाटेगांवकर, दादा पासलकर यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार

शाहीर दीनानाथ साठे वाटेगांवकर, दादा पासलकर यांना अण्णा भाऊ साठे पुरस्कार

हा पुरस्कार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुण्यतिथीनिमित्ताने जाहीर करण्यात येत आहे. रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार तसेच व्यवस्थापन प्रतिनिधी राजेश पांडे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण १ ऑगस्ट,२०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठात करण्यात येणार आहे.

अण्णा भाऊ साठे पुरस्कार निवड समितीतील सदस्य प्राचार्य डॉ. गणेश राऊत, डॉ. श्यामा घोणसे, डॉ. प्रशांत साठे, डॉ. गौतम बेंगाळे, डॉ. तानाजी हातेकर, डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, डॉ. सुनील भंडगे आदींनी या पुरस्कारार्थीची निवड केली.

फोटो - दिनानाथ साठे, दादा पासलकर

Web Title: Anna Bhau Sathe Award to Shahir Dinanath Sathe Wategaonkar, Dada Pasalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.