पुण्यातील ५१ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साकारला अंकुर गणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:15 IST2021-09-06T04:15:53+5:302021-09-06T04:15:53+5:30
जय गणेश व्यासपीठमधील तब्बल ५१ गणपती मंडळांनी प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने पर्यावरणपूरक श्री गणेशाचे स्वरूप साकारले. अंकुर गणेशा कार्यशाळेचे ...

पुण्यातील ५१ गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साकारला अंकुर गणेशा
जय गणेश व्यासपीठमधील तब्बल ५१ गणपती मंडळांनी प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने पर्यावरणपूरक श्री गणेशाचे स्वरूप साकारले. अंकुर गणेशा कार्यशाळेचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. शाळेत करण्यात आले होते. या वेळी ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, पराग ठाकूर, स्वप्निल दळवी, किरण सोनीवाल, शिरीष मोहिते, उमेश सपकाळ, कुणाल पवार, अमित जाधव, प्रशांत खंडागळे, हरीश खंडेलवाल राजेंद्र तिकाणे, अनिल मोहिते, विशाल ओहाळ, नीलेश पवार, आशिष गुंडकल, अभिषेक मारणे आदी गणेशोत्सव कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना पीयूष शाह यांची होती.
सुप्रसिद्ध शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी या वेळी गणेशोत्सव कार्यकर्त्यांना मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.
पीयूष शाह म्हणाले, गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या मूर्तीत गणेशाला आवडणारे शमी किंवा जास्वंद फुलाच्या बियांचे रोपण करण्यात आले आहे. हीच मूर्ती पूजेची मूर्ती म्हणून कार्यकर्ते आपल्या मांडवात बसविणार आहेत. आणि विसर्जन करून त्या बियातून अंकुर फुटल्यानंतर त्याचे झाड कुंडीत किंवा मोकळ्या जागेत लावणार आहे.