आर्किटेक्चर डिझाईन ऑलिंपियाड राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या अंकिता ढाणकेची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:31+5:302021-02-05T05:20:31+5:30

या स्पर्धेमध्ये तीन फेरीमधील निकषांची पूर्तता केल्यानंतर अंतिम फेरीसाठी दहा संघांची निवड केली होती. अंतिम संघांमध्ये त्रिचुरापल्ली, अहमदाबाद, ग्वालियर, ...

Ankita Dhanke of Pune at the Architecture Design Olympiad National Competition | आर्किटेक्चर डिझाईन ऑलिंपियाड राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या अंकिता ढाणकेची मोहोर

आर्किटेक्चर डिझाईन ऑलिंपियाड राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या अंकिता ढाणकेची मोहोर

या स्पर्धेमध्ये तीन फेरीमधील निकषांची पूर्तता केल्यानंतर अंतिम फेरीसाठी दहा संघांची निवड केली होती. अंतिम संघांमध्ये त्रिचुरापल्ली, अहमदाबाद, ग्वालियर, मुंबई अशा भारतातील विविध शहरातील आर्किटेक्चर महाविद्यालयाचे संघ सहभागी होते.

अंतिम फेरीतील सर्व संघाचे सादरीकरण ऑनलाइन पद्धतीने ३० जानेवारी रोजी करण्यात आले. सादरीकरणाचे मूल्यमापन प्रख्यात आर्किटेक्ट प्रशांत सुतारीया, आर्किटेक्ट विवेक भोले, आर्किटेक्ट सी. एस. रघुराम, आर्किटेक्ट कार्ल वाडिया यांनी केले. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर इंडियाचे अध्यक्ष आर्किटेक्ट हबीब खान हे होते. अंकिताची आई ज्योती ढाणके या लवळे येथील भारती विद्यापीठाच्या अभियंता महाविद्यालयात गणित विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. अंकिताला या स्पर्धेसाठी मुंबई महाविद्यालयातील शिक्षकाबरोबरच तिच्या आईचेही विशेष मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.

संघाने केलेल्या सादरीकरणाच्या आधारे सर जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर मुंबई हा संघ उपविजेता ठरला. या संघांमध्ये कुमारी अंकिता ढाणके, कुमारी सखी बाहेती, सागर कारकंडे हे विद्यार्थी सहभागी होते. विजेत्या संघाचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य आर्किटेक्ट डॉ. राजीव मिश्रा आर्किटेक्ट, कल्याणी मोकसदार यांनी केले आहे.

फोटो : अंकिता ढाणके

Web Title: Ankita Dhanke of Pune at the Architecture Design Olympiad National Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.