शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वन विभागाकडून १७५ पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 13:50 IST

बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात वन विभागातर्फे दरवर्षी प्राणी गणना केली जाते...

ठळक मुद्देबुद्ध पौर्णिमा : भीमाशंकर, सुपे, रेहकुरी, माळढोक अभयारण्यात गणनाप्राणी वन विभागाकडून प्रगणनेच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबतच्या सूचनांचे परिपत्रक

पुणे : वन विभागातर्फे येत्या बुद्ध पौर्णिमेला चार अभयारण्यामधील १७५ पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सर्व तयारी वन विभागातर्फे पूर्ण केली आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, मयुरेश्वर-सुपे आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी आणि माळढोक अभयारण्यात वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही वन्यप्राणी प्रेमी प्राणी प्रगणनेच्या उपक्रमात सहभाग घेणार आहेत.पुणे वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखिडे म्हणाले, बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात वन विभागातर्फे दरवर्षी प्राणी गणना केली जाते. वन विभागाकडून भीमाशंकरच्या अभयारण्यात आढळणाऱ्या वन्य, प्राणी व पक्षांची प्रगणना केली जाते. त्यात प्रामुख्याने शेकरू, बिबट्या, रानडुक्कर, वानर, माकड आदी वन्य प्राण्यांची नोंद घेतली जाते. त्याचप्रमाणे बारामती तालुक्यातील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात चिंकारा, काळवीट आदींची गणना केली जाते. पुणे व अहमदनगर या दोन्ही अभयरण्यातील प्राणी व पक्षांची प्रगणना येत्या १८ व १९ मे रोजी केली जाणार आहे.वानखिडे म्हणाले, प्राण्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची पूर्ण काळजी घेवून अभयारण्यातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांवर प्राणी प्रगणना केली जाते. दिवसा कृत्रिम पाणवठ्यांवर माणसांकडून हस्तक्षेप केला जातो. रात्री हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्रत्यक्ष दिसणाऱ्या प्राण्यांची नोंद घेतली जाते. मात्र, सर्वच प्राणी दररोज पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येत नाहीत. तसेच पाणवठ्यावर आलेल्या सर्वच प्राण्यांची नोंद घेता येत नाही. त्यामुळे सध्या इंडेक्स पद्धतीने प्राणी प्रगणना केली जात आहे. परंतु, या पद्धतीतून वन्य प्राण्यांच्या संख्यात्मक वाढीचा अंदाज घेता येतो.........* प्राणी प्रगणनेच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याबाबतच्या सूचनांचे परिपत्रक वन विभागाकडून काढण्यात आले आहे. त्यानुसार सध्या उन्हाळा असल्याने एकच प्राणी दोन वेळा पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येवू शकतो. त्यामुळे एकाच प्राण्याची दोन वेळा नोंद करू नये. निसर्गानुभव घेण्यासाठी येणाºया व्यक्तींनी निसर्गाशी समरूप होणारे कपडे परिधान करावे.  *भडक रंगाचे किंवा पांढरे शुभ्र कपडे वापरू नये. उग्रवास असलेली सुगंधी द्रव्ये कपड्यावर लावू नये. रात्री सर्च लाईट किंवा विजेचा वापर करू नये. अभयारण्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या घेवून जाऊ नये, आदी सूचना वन विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेforest departmentवनविभागforestजंगल