कृषिदूताने राबवली पशु लसीकरण मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:09 IST2021-09-25T04:09:48+5:302021-09-25T04:09:48+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेल्या डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलडाणा येथे शिक्षण घेत असलेला कृषिदूत ...

कृषिदूताने राबवली पशु लसीकरण मोहिम
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत असलेल्या डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय बुलडाणा येथे शिक्षण घेत असलेला कृषिदूत रितेश आनंदा सुकाळे याने ग्रामीण कृषी कार्यक्रमाअंतर्गत जनावरांवर व पशुपक्ष्यांवर होणारे विविध संसर्गजन्य आजारांवर लसीकरण केले तसेच विविध संसर्गजन्य आजार व त्यावर करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना या विषयावर पशु वैद्यकीय डॉ. सयाजी गाढवे, डॉ. संतोष गाढवे यांच्याकडून मार्गदर्शन व माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. यू. वाघ व कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. गायकवाड विषयतज्ज्ञ प्रा. पी. जी. काळमेघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : जनावरांच्या आजारांवर मार्गदर्शन करताना कृषिदूत रितेश सुकाळे.