शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मांढरदेवीच्या यात्रेत पशुपक्षी हत्या आणि दारूबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 14:11 IST

राज्यभरातून भाविक येतात प्रसिद्ध मांढरदेवी यात्रेला

ठळक मुद्देमांढरदेवीच्या यात्रेबाबत प्रशासनाकडून सुविधांबाबत आढावा : ९, १0, ११ जानेवारीला यात्रानियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार

भोर :  राज्यात प्रसिद्ध असलेल्या मांढरदेवीच्या यात्रेनिमित्त प्रशासनाकडून खराब रस्त्यांची दुरुस्ती, बाहेरील अतिक्रमणे काढणे, पोलीस तपासणी पथक, आरोग्याची सुविधा, एसटी बसची सेवा, पिण्याच्या पाण्याची, वाहनांच्या पार्किंगची सुविधा फायर ब्रिगेड, स्वच्छतागृह या सुविधांबाबत आढावा घेण्यात आला आणि कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. तर यात्राकाळात पशुपक्षी हत्या व दारूबंदी करण्यात आली असून त्यासाठी तपासणी पथके नेमण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले. ९, १०, ११ जानेवारीला मांढरदेवच्या काळुबाईची यात्रा असून त्यानिमित्त तहसीलदार अजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची बैठक घेऊन वरील सूचना केल्या. यावेळी गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस निरीक्षक राजू मोरे, तालुका  अधिकारी डॉ. सूर्यकांत काराळे, सहायक अभियंता वीज वितरण मंडळ संतोष चव्हाण, पशुधनविकास अधिकारी पी. बी रेवतीकर, शाखा अभियंता वाय. ओ. मेटेकर, आगारप्रमुख एस. आर. हिवाळे संबंधित गावचे तलाठी, ग्रामसेवक व पोलीसपाटील उपस्थित होते.   सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरचे खड्डे भरले असून घाटातील दरडी, गवत काढून रस्ता रुंद करणे रंगरंगोटी व रिफ्लेक्टर नामफलक लावण्यात आले आहेत. रामबाग येथील उपजिल्हा रुग्णालय ते चौपाटी शिवाजी पुतळा येथील अतिक्रमणे काढण्यात येणार असून, संपूर्ण रस्त्यावरील झाडांच्या फांद्या काढून रस्ता वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वाय. ओ. मेटेकर यांनी सांगितले. आरोग्य विभागाकडून आंबाडखिंड घाटाखाली एक आरोग्य पथक दिवसरात्र ठेवण्यात येणार असून, त्यात एक वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक आरोग्य सहायक, फार्मासिस्ट, शिपाई नेमणूक करण्यात आली असून, ३ रुग्णवाहिका एक फिरते पथक उपजिल्हा रुग्णालयात १२ खाटांचा एक वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे, महामार्गावरील शिंदेवाडी ते कापूरव्होळ व भोर आंबाडे गावापर्यंतच्या विहिरींचे पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे. संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत काराळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुमारे जादा गाड्यांची सोय करण्यात आली असून, वायरलेस यंत्रणा दोन टँकर घाटात व मध्यभागी एक पथक रुग्णवाहिका, स्पीकरची सोय करण्यात येणार आहे.........पोलीस करणार ठिकठिकाणी तपासणी  पोलीस विभागाकडून वाहतूक सुरळीत राहावी, म्हणून भोर पोलीस राजगड पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग यांचे पथक नेमण्यात येणार आहे. भोर एसटी स्टँड, रामबाग, चौपाटी भोर आंबाडखिंड आयटीआयसमोर पार्किंगजवळ पोलीस तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे अवैध प्रवासी वाहतूक होणार नाही, याची काळजी भोर पोलिसांना घ्यावी लागणार आहे. शहरासह सर्व बाहेरील अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढण्यात यावीत. याचा त्रास भाविकांना होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना तहसीलदार अजित पाटील यांनी दिल्या...............तर त्यांच्यावर कडक कारवाई : पाटीलमांढरदेवी आणि कांजळे यात्राकाळात पशुपक्षी हत्याबंदी आणि दारूबंदी करण्यात आली असून त्याची भरारी पथकाच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोणत्याही भविकांनी पशुपक्षी आणल्यास पोलीस तपासणी पथक जप्त करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.   ....................तपासणी पथकाच्या माध्यमातून वाहनांची व चालकाची तपासणी करून मद्यप्राशन केलेले नाही, याची खात्री केली जाणार असून नंतरच वाहने सोडली जाणार आहेत, तर गाड्या भरल्या की मांढरदेवला पाठवल्या जातात. त्यासाठी स्पीकरवर जाहीर केले जाणार आहे.घाटात क्रेनची सोय करणार असल्याचे आगारप्रमुख एस. आर. हिवाळे यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीकडून यात्राकाळात विजेची व्यवस्था करणे, भारनियमन होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

टॅग्स :bhor-acभोरMandhardevi Yatraमांढरदेवी यात्राcollectorजिल्हाधिकारी