शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडण्यात आले; देशमुखांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 21:09 IST

बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देशमुख यांनी ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली.

बारामती दि २१ (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात तोडफोडीचे राजकारण सुरु आहे. भाजपच्या माध्यमातून शिवसेना फोडण्यात आली.प्रत्येक आमदाराला ५० कोटी देऊन आमचे सरकार पाडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक  वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून  फोडण्यात आले. हे संपूर्ण महाराष्ट्राने , देशाने उघड्या डोळ्याने हे राजकाण पाहिले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. इडी, सीबीआयची भिती दाखवायची.  लोकसभा निवडणुकीत जनता याचे उत्तर देईल, अशी  टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर केली.

बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देशमुख यांनी ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी बारामतीत गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत भटक्या विमुक्त सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलताना  देशमुख यांनी पुत्र व कन्येच्या प्रेमापोटी शिवसेना व राष्ट्रवादी फुटली या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या टिकेला उत्तर देताना  ही टीका  केली.

देशमुख पुढे म्हणाले, फोडाफोडीला जनता कंटाळली असून येत्या लोकसभा निवडणूकीत भाजपला ती उत्तर देईल, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात सध्या मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. आमचे जे लोक त्यांच्यासोबत गेले आहेत. त्यातील अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना आपली दिशाभूल झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे  विधानसभा निवडणूक आल्यानंतर मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या आमदारांची  मोठ्या प्रमाणात घरवापसी झाल्याशिवाय राहणार नाही, असा देखील दावा देशमुख यांनी केला.

देशमुख पुढे म्हणाले,सध्या भाजपचे आमदार बिचारे सर्वात  दुखी आहेत. आम्हाला ते विधानसभेत भेटतात. ते म्हणतात बाहेरुन आमच्या पक्षात  आलेले लोक मंत्री होतात,आम्ही त्यांच्या तोंडाकडे पाहत बसतो. बाहेरून येणारे पहिल्या पक्तींत बसले. आमचा अजुन नंबर लागत नाही.त्यांना बाजुला ठेवुन बाहेरुन आलेल्यांना मंत्रीपदे दिली जातात.त्यामुळे या सगळ्यात भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी आहेत.त्यांच्या मनात नाराजीची भावना असल्याचे  देशमुख म्हणाले.

यावेळी देशमुख यांनी सुप्रिया सुळे यांचे काैतुक केले.सुळे यांचे गेल्या १५ वर्षातील काम संबंध देशाला माहित आहे. केंद्र व राज्याच्या माध्यमातून त्या विकासासाठी प्रयत्नशील राहिल्या आहेत. कामाच्या बाबतीत सतर्क असणाऱया खासदार म्हणून त्या अोळखल्या जातात. बारामती मतदारसंघातील जनता त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देईल, असे देशमुख म्हणाले.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुख