पूर्वीच्या भांडणाचा राग; एकावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:44 IST2017-08-02T03:25:41+5:302017-08-02T03:44:45+5:30

पूर्वीपासूच्या भांडणामुळे खोटी केस केल्याच्या रागातून आठ जणांनी एकावर कोयत्याने वार केले. तो पळून जात असताना पाठीत दगड मारून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक

Anger of the past arguments; Hit one by one | पूर्वीच्या भांडणाचा राग; एकावर कोयत्याने वार

पूर्वीच्या भांडणाचा राग; एकावर कोयत्याने वार

वारजे : पूर्वीपासूच्या भांडणामुळे खोटी केस केल्याच्या रागातून आठ जणांनी एकावर कोयत्याने वार केले. तो पळून जात असताना पाठीत दगड मारून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, पाच जणांविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास दत्तात्रय शिरसाठ (वय २३, रा. रामनगर, वारजे), आकाश विजय काळेकर (वय २२, रा. देशमुखवाडी, शिवणे, विकी विजय काळेकर (वय २४, रा. रामनगर गोसावीवस्ती, वारजे) अशी अटक केलेल्यांची तर सुनील गुंजाळ, काळ्या येणपुरे (रा. रामनगर वारजे), दाद्या काळेकार, गणेश वांजळे आणि पांडुरंग वांजळे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे सलूनचे दुकान आहे. फिर्यादी आणि आरोपींची पूर्वीपासून भांडणे आहेत. फिर्यादी यांनी त्यांच्यावर खोटी केस केली आहे, या कारणावरून चिडून जाऊन आरोपींनी दुकानावर कोयता मारून काचा फोडल्या. फिर्यादी यांना दुकानातून बाहेर ओढून कोयत्याने डोक्यात व कानावर वार केले. पळून जात असताना त्यांच्या पाठीत दगड मारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक निकम पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Anger of the past arguments; Hit one by one