त्याचे घडले असे, राजुरी (ता. जुन्नर) येथील किरण अंकुश कणसे (वय २८) त्यांची पत्नी अनुराधा कणसे (वय २३ ) आणि मुलगा शिवांश कणसे ( वय दीड वर्ष ) गे दुचाकीवरून पुण्याहून राजुरी कडे जात असताना बुधवारी सकाळी ७ वाजता नारायणगाव बायपास जवळ आले असताना दुचाकीत साडीचा पदर अडकल्याने दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात तिघांना गंभीर दुखापत झाली होती. याचवेळी नारायणगाव ग्रामापंचायतीचा कचरा खाली करून नारायणगावच्या दिशने चाललेले घंटागाडी वरील कर्मचारी सागर पवार यांनी अपघात झाल्याचे पाहून अपघातातील सर्व जखमींना घंटागाडीत घेतले आणि तातडीने नारायणगाव येथील भोसले हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉ. हनुमंत भोसले यांनी कणसे कुटुंबीयावर तातडीने उपचार केले. सध्या कणसे कुटुंबाची प्रकृती स्थिर आहे.
कोरोनाच्या काळात कोणी मदतीला पुढे यात नाही, अशा परिस्थितीत सागर पवार यांनी मानवतेचे दर्शन देत कणसे कुटुंबाला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. सागर पवार यांच्या रुपात देवदूत भेटल्याची भावना किरण कणसे यांनी व्यक्त केली आहे .
--
२२ नारायणगाव सागर पवार