मंजुरी मिळाल्यानंतरही अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिकांची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 01:00 IST2018-11-17T00:59:45+5:302018-11-17T01:00:09+5:30
जिल्हा परिषद : पदे मंजूर असूनही भरती खोळंबली

मंजुरी मिळाल्यानंतरही अंगणवाडीसेविका, पर्यवेक्षिकांची पदे रिक्त
पुणे : बालकांना बालवयात शिक्षणाची गोडी लागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे अंगणवाड्या चालविल्या जातात. या साठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनिस तसेच बालविकास प्रशिक्षण अधिकारी आणि सहायक अधिकारी मोलाची भूमिका बजावत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून यांची भरती जिल्हा परिषदेतर्फे झाली नसल्याने अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचा-यांवर भार येत आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कुपोषणमुक्ती तसेच बालकांच्या विकासाठी अंगणवाड्या चालविल्या जातात. यासाठी बाल विकास प्रशिक्षण अधिकारी, सहाय्यक बालविकास प्रशिक्षण अधिकारी यांच्या सोबतच पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी केंद्र चालविले जातात. यांच्या मार्फत बालकांचा सर्वांगिण विकास आज साधला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पदांची भरती प्रक्रिया बंद आहे. ज्येष्ठनेतनुसार बहूतांश कर्मचारी रिक्त झाल्याने अनेक पदे ही रिक्त झाले आहेत. मात्र, ही रिक्त पदे गेल्या काही दिवसांपसून रिक्त आहेत. ही पदे न भरल्याने कर्मचा-यांवर ताण
येत आहेत.
बाल विकास प्रशिक्षण अधिकाऱ्यांची २१ पदे मंजुुर आहेत. यातील केवळ ८ पदे भरली गेली असल्याने १३ जागा रिक्त आहेत. पर्यवेक्षिकांचे जवळपास १६४ पदे मंजुर आहेत. मात्र, १४७ पदे ही भरली गेली आहेत. १७ पदे ही रिक्त आहेत. अंगणवाडी सेविकांची ४ हजार १५० पदे ही मंजूर आहेत. यातील ४ हजार ४० पदे ही भरली गेली असून जवळपास १०० पदे ही रिक्त आहेत. तसेच मदतनिसांची ४ हजार १५० पदे मंजुर असतांना केवळ ३ हजार ९६२ पदे ही भरली गेली आहेत. १८८ मदतनिसांची पदे ही रिक्त आहेत. मिनी अंगणवाडी केंद्रासाठी ४७३ पदे मंजुर असतांना ४३९ पदे भरली गेली असून ३४ पदे ही रिक्त आहेत.