अंगणवाडी झाली सुनीसुनी
By Admin | Updated: August 9, 2014 23:15 IST2014-08-09T23:15:32+5:302014-08-09T23:15:32+5:30
माळीण दुर्घटनेत लहान चिमुकली व येथील अंगणवाडीत शिक्षण घेत असलेली 12 मुले मृत्युमुखी पडली.

अंगणवाडी झाली सुनीसुनी
घोडेगाव : माळीण दुर्घटनेत लहान चिमुकली व येथील अंगणवाडीत शिक्षण घेत असलेली 12 मुले मृत्युमुखी पडली. यामध्ये रुद्र मच्छिंद्र लेंभे हा तीन महिन्यांचा बालक बचावला. मात्र, अंगणवाडीत या चिमुकल्यांना शिकवणा:या कुसुम नामदेव झांजरे व मदतनीस उषा मच्छिंद्रनाथ झांजरे यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. अंगणवाडी पर्यवेक्षिका सी. बी. खामकर यांना या शाळेविषयी व या दोन महिलांविषयी विचारले असता त्यांना गहिवरून आले.
माळीण येथे शाळेच्या बाजूलाच अंगणवाडी आहे. आज या अंगणवाडीची इमारत शाबूत राहिली आहे; मात्र तेथे शिकणारी मुले या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली. या गावावात क् ते 6 वर्षे वयोगटातील 19 मुले होती. त्यांपैकी 12 मुले मृत्युमुखी पडली, तर आजूबाजूच्या वाडय़ावस्त्यांवरील 7 मुले जिवंत राहिली. यामध्ये दीक्षा लुमाजी शेळके, स्नेहा सखाराम झांजरे, प्रतिमा लुमाजी शेळके, जय मारुती गाडेकर, अनुष्का मंगेश झांजरे, कुणाल भागू झांजरे, साईराज संदीप दांगट, सुयश संदीप झांजरे, ईश्वरी रविकांत झांजरे, पिंटी मंगेश झांजरे, आदित्य नामदेव पोटे, कोमल नामदेव झांजरे ही मुले मृत्युमुखी पडली. तर रुद्र मच्छिंद्र लेंभे, रोनित गणोश झांजरे, ऋतिक जालिंदर झांजरे, मनाली गणोश झांजरे, पिंटू हरिश्चंद्र झांजरे, पिंकी जालिंदर झांजरे, अनुज सुरेश पोटे हे सात जण वाचले. (वार्ताहर)