...अन् त्यांना पुन्हा मिळाला हक्काचा निवारा
By Admin | Updated: November 16, 2016 02:38 IST2016-11-16T02:38:48+5:302016-11-16T02:38:48+5:30
ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पै-पै जमा केली; त्यांनीच उतारवयात आई-वडिलांना बेघर केले़ मात्र, अशा अवस्थेतही खचून न जाता आई-वडिलांनी मुलांविरोधात लढा दिला़

...अन् त्यांना पुन्हा मिळाला हक्काचा निवारा
नवनाथ शिंदे / पिंपरी
ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन पै-पै जमा केली; त्यांनीच उतारवयात आई-वडिलांना बेघर केले़ मात्र, अशा अवस्थेतही खचून न जाता आई-वडिलांनी मुलांविरोधात लढा दिला़ अखेर तहसीलदारांच्या कार्यवाहीनंतर सत्तरी पार केलेल्या पाटील दाम्पत्याला पुन्हा एकदा हक्काचा निवारा असलेले घर मिळाले.
सुरेंद्र नरसगोंडा पाटील (वय ७८) सुनंदा सुरेंद्र पाटील (वय ७३) हे दाम्पत्य निगडीत राहते़ वर्षभरापासून त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना बेघर केले होते़ उतारवयात दोघांनाही घराच्या माळ्यावरील एका कोपऱ्यात ठेवले. त्यामुळे त्यांचे हाल सुरू होते़ मुलांकडून या वयात अवहेलना सोसवत नव्हती. तरीही त्यांच्याविरोधात लढा देण्याचा निर्णय पाटील दाम्पत्याने घेतला. शासनाच्या ज्येष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणकारी कायद्यानुसार पाटील दाम्पत्याने हक्काचा निवारा मिळण्यासाठी २० फे बु्रवारीमध्ये प्रांत कार्यालयाकडे अर्ज दाखल केला़ पाटील यांनी केलेल्या अर्जावर प्रांत कार्यालयाने तातडीने दखल घेतली. दोन्ही मुलांनी आई-वडिलांना पोटगी म्हणून प्रत्येकी अडीच हजार रूपये देण्याचा आदेश दिला़ मात्र, मुलांनी आई-वडिलांना पोटगीची रक्कम दिली नाही़ त्यामुळे पाटील दाम्पत्याने पुन्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे घराचा ताबा मिळण्यासाठी अर्ज दाखल केला़
संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मे रोजी मुलांना घराचा ताबा आई-वडिलांकडे देण्याचा आदेश दिला़ या निर्णयाविरोधात पाटील यांच्या मुलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ मात्र, न्यायालयाने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत घराचा ताबा पाटील
दाम्पत्याला देण्याचा आदेश दिला़ त्यानुसार पिंपरी-चिंचवडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पोलिसांना आदेश देऊन मुलांना ताब्यातील घर सोडण्यास सांगितले़
अखेर प्रशासनाने त्वरेने घेतलेल्या निर्णयामुळे ८ नोव्हेंबरला पोलिसांच्या सहकार्याने पाटील दाम्पत्याला
घराचा ताबा परत देण्यात आला़
या सर्व संघर्षात त्यांना कौटुंबिक
मित्र असलेले मोहन डोरले यांनी सहकार्य केले.