शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Dahi Handi 2018 : ...अाणि त्यांनी सुद्धा थर लावून फाेडली दहीहांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 15:08 IST

पुण्यात अाज सकाळी दृष्टीहिन युवक-युवतींनी दहीहांडी फाेडून या सणाचा अानंद साजरा केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे कसबा पेठेत या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते.

पुणे : दहीहांडी चा उत्साह शहरभर दिसून येत अाहे. सगळीकडे अानंद, चैतन्य भरवणारा असा हा सण. एकावर एक थर लावून उंचावरील दहीहांडी फाेडताना मंडळांमधील उत्साह शिगेला पाेहचलेला असताे. पुण्यात अाज सकाळी दृष्टीहिन युवक-युवतींनी थर लावत दहीहांडी फाेडून या सणाचा अानंद साजरा केला. शाहीर हिंगे लाेककला प्रबाेधिनीतर्फे कसबा पेठेत या उपक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. कात्रज येथील शारदा वसतीगृहातील दृष्टीहिन युवकांनी व एकलव्य बाल शिक्षण न्यास संस्थेतील मुलांनी दहिहंडी फोडली. यावेळी न्यू गंधर्व बॅन्ड यांनी वादन केले. तसेच गोपाळकाला म्हणून संस्थेतील मुलांना महिनाभराचा शिधा मदत स्वरूपात देण्यात आला. संस्थेतर्फे एकलव्य बाल शिक्षण न्यास संस्थेच्या इंद्रायणी गावस्कर यांना माता यशोदा सन्मानाने गौरविण्यात आले. 

    यावेळी समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला असलेल्या मुलांना आनंद देण्यासाठी व त्यांना यशस्वीपणे उभे करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. आज मला माता यशोदा सन्मानाने गौरविण्यात आले याचे सर्व श्रेय हे माझ्या आई रेणू गावस्कर व संस्थेतील मुलांचेच आहे. मी त्यांना जेवढा आनंद दिला त्यापेक्षा दुप्पट आनंद मला त्यांच्याकडून मिळाला आहे. त्यामुळे अशा उपेक्षित मुलांसाठी यशोदा मातेप्रमाणे काम करणे हे माझे उद्दिष्ट आहे, असे मत एकलव्य बाल शिक्षण न्यास संस्थेच्या इंद्रायणी गावस्कर यांनी व्यक्त केले.         शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, विशेष मुलांना समाज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांनाही सण-उत्सवाचा आनंद घेता यावा, या करीता प्रबोधिनीतर्फे दरवर्षी आपली दहीहंडी चे आयोजन करण्यात येते. तसेच उपेक्षित मुलांसाठी काम करणाऱ्या महिलांना प्रबोधिनी तर्फे यशोदा माता सन्माने गौरविण्यात येते. सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या सन्मानाचे आयोजन करण्यात येते.

टॅग्स :PuneपुणेDahi Handiदही हंडीnewsबातम्या