आणि ‘ती’ बिबट्याच्या जबड्यातून वाचली!
By Admin | Updated: February 24, 2015 01:42 IST2015-02-24T00:32:21+5:302015-02-24T01:42:00+5:30
जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत दुचाकीस्वारांना लक्ष्य करणाऱ्या बिबट्याने रात्री अडीचच्या सुमारास

आणि ‘ती’ बिबट्याच्या जबड्यातून वाचली!
मढ : जुन्नर तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. आतापर्यंत दुचाकीस्वारांना लक्ष्य करणाऱ्या बिबट्याने रात्री अडीचच्या सुमारास आदिवासीवस्तीवर एका घरातच प्रवेश केला . पडवीत झोपलेल्या चौदावर्षीय युवतीचे डोके जबड्यात धरले. मात्र, ती ओरडल्याने तिच्या वडिलांनी कुऱ्हाड घेऊन त्याला हुसकवले आणि ती त्याच्या जबड्यातून सुटली.
निर्मला शिवाजी पारधी (रा. डिंगोरे, भलेवाडी) असे त्या युवतीचे नाव आहे. तातडीने तिला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. पुढील उपचारांसाठी तिला पुण्यातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले.
याबाबत उदापूर, डिंगोरेचे वनरक्षक एस. जी. मोमीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला पडवीत झोपलेली असताना पहाटे अचानक बिबट्याने घरात प्रवेश केला.
तिचे वडील किसन शिंदे शेतावर रात्री पाणी भरून दोनच्या सुमारास घरी आल्यावर जेवत होते. परंतु लाईट नव्हती. अचानक पडवीतून मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे ते पळत बाहेर गेले व त्यांनी बिबट्या मुलीला ओढत असल्याचे पाहिले. बिबट्याने तिला डोक्याच्या बाजूने धरून पाच फुटांपर्यंत ओढले. प्रसंगावधान दाखवून तिच्या वडीलांनी कुऱ्हाड घेवून त्याला हुसकावले. आरडाआरेड केल्याने तो पळून गेला. तिच्या कपाळाला एक व डोक्यात दात लागला आहे. (वार्ताहर)