...आणि इच्छुकांचे मंडप उतरले

By Admin | Updated: February 11, 2017 02:57 IST2017-02-11T02:57:27+5:302017-02-11T02:57:27+5:30

महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांनी आपापला उमेदवारीवरील हक्क सांगायला सुरुवात केली होती

... and the pavilion of the wants came down | ...आणि इच्छुकांचे मंडप उतरले

...आणि इच्छुकांचे मंडप उतरले

पुणे : महापालिका निवडणुकांची आचारसंहिता सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांनी आपापला उमेदवारीवरील हक्क सांगायला सुरुवात केली होती. विशेषत: भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच पत्रकबाजीला सुरुवात केली
होती. या इच्छुकांना
शेवटच्या क्षणापर्यंत ‘तुम्हाला उमेदवारी देऊ,’ असे आश्वासन देत झुलवत ठेवण्यात आले. मात्र, उमेदवारी वाटपादरम्यान भलेभले ‘गारद’ झाले. या गारद इच्छुकांचा केवळ उत्साहच नाही तर त्यांचे मंडपही उतरू लागले आहेत.
राजकीय पक्षांमध्ये अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने
‘कामाला’ लागण्याच्या सूचना शहर पदाधिकारी आणि आमदार, खासदारांनी दिलेल्या होत्या. अनेक पक्षांमध्ये शहर पातळीवर काम केलेले आणि विधानसभा क्षेत्रामध्ये उत्तम जनसंपर्क असलेले अनेक इच्छुक समोर आले. विद्यमान नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकारी आपल्याला उमेदवारी मिळणार, अशी आशा बाळगून होते. दरम्यान, सर्वच पक्षांमध्ये चढाओढीच्या राजकारणाला रंग भरू लागला होता. कोण कोणाचा पतंग कापतो आणि कोणता मासा कोणत्या पक्षाच्या गळाला लागतो याची रणनिती आखण्यात पक्षांचे धुरंदर मग्न होते.
आपापल्या ‘गॉड फादर’कडे तिकिटासाठी आशाळभूतपणे डोळे लावून बसलेल्यांना आगाऊ इशारे मिळालेले होते. या इशाऱ्यांमुळे ‘उमेदवारी पक्की’ असा भाबडा समज झालेल्या इच्छुकांनी सरळ निवडणूक कचेऱ्या उघडल्या.
टेबलं मांडून कार्यकर्ते बसवले. मतदारयाद्या छापून घेत प्रचाराला सुरुवात झाली. कार्यकर्तेही
आपला भाऊ, आपली ताईच
आता रिंगणात उतरणार म्हणून जोमाने कामाला लागले. कार्यकर्तृत्वाची साक्ष असलेली पत्रके छापून घेण्यात आली. ही पत्रके घरोघर जाऊ लागली.
(प्रतिनिधी)

Web Title: ... and the pavilion of the wants came down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.