शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...अन् वाढदिवशी अचानक शेतात शरद पवार आले आणि अभिष्टचिंतन व शुभेच्छा दिल्या

By श्रीकिशन काळे | Updated: August 3, 2023 15:22 IST

ज्येष्ठ कविवर्य ना. धों. महानोर काहीही माहिती न देता पवारांनी थेट त्यांच्या शेतात जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या

पुणे : निसर्गाशी एकरूप होऊन कवितेबरोबरच शेती करणारे ज्येष्ठ कविवर्य ना. धों. महानोर यांचा वाढदिवस होता. तेव्हा त्या दिवशी त्यांच्या शेतामध्ये त्यांना भेटायला खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आले होते. महानोर यांना काहीही माहिती न देता पवारांनी थेट त्यांच्या शेतात जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ही २०१६ मधील प्रसंग आहे.  याविषयीची आठवण महानोर यांनी फेसबुकवर फोटोसह पोस्ट केली होती. ती त्यांची पोस्ट फोटोसह खास त्यांना आदरांजली म्हणून देत आहोत. दि. 16 सप्टेंबर 2016

- मी माझा वाढदिवस कधीच उत्सवानं साजरा करीत नसतो. आपल्या रानातल्या घरी बसून येतील त्या स्नेहीजनांच्या शुभेच्छा, आशीर्वाद स्विकारीत असतो. या १६ सप्टेंबरला म्हणे अमृत महोत्सवी वर्ष आहे. म्हणून आम्ही कुटुंबीय शेतातल्या घरी असतांना न सांगता अकस्मात श्री. शरदराव पवार साहेब आले. अभिष्टचिंतन व शुभेच्छा दिल्या. अगदी कौटुंबिक भेटी. विधिमंडळात मी बारा वर्षे काम करतांना शेती, पाणी, दुष्काळ, फलोद्यान, ठिबक, पाणी व्यवस्थापन, ‘पाणी अडवा जिरवा’ ते जलसंधारण जलयुक्त अभियान, या सोबतच साहित्य संस्कृती मंडळ, कला अकादमी, चित्रपट, ग्रंथालयं व अनेक सामाजिक प्रश्नांची दीर्घ चर्चा, ठराव मांडले, बहुसंख्य शासनानं पारित केले. याचा मला खूप आनंद आहे. विधिमंडळातल्या त्या निवडक कामकाजाचा ऐवज ‘विधिमंडळातून’ या पुस्तकातून मी प्रकाशित केला. श्री. शरदराव पवार साहेबांच्या हस्ते त्या पुस्तकांच प्रकाशन १६ सप्टेंबरला पळासखेडच्या माझ्या रानात झालं. त्यामुळे अवघ्या प्रसिध्दी माध्यमांनी ते महाराष्ट्रभर दाखविलं. आश्चर्य व आनंद याचा की पंधरादिवस खुप झाले. खूप फोन भेटी- अनेक क्षेत्रातल्या स्नेही मंडळींनी मला शुभेच्छा व आशीर्वाद दिले. माझी ही आनंदयात्रा त्यांनी भरभरुन अधिक आनंददायी केली. ‘विधिमंडळातून’ या ग्रंथाचं भक्क्म स्वागत केलं. मी भरुन पावलो. 4 महिन्यांपूर्वी माझं फार मोठं हृदयाचं ऑपरेशन झालं. यामुळे माझं शारिरिक मानसिक दु:ख हलकं झालं. माझ्यावर प्रेम करणाऱ्या या स्नेही मंडळींचे आभार यातुन, मी धन्यवाद कसे देवु? गलबला होतो. डोळे भरुन येतात. एका लहानशा खेड्यातल्या मला शेतकऱ्याला कवीला शब्दांनी सांगता येणार नाही इतकं दिलं. त्या सकलांसाठी माझे नम्रता पूर्वक नमस्कार. मिळालेलं जादा आयुष्य, तीच खेडी, तिथला शेतकरी मजूर आणि नव्यानं छान लिहिणाऱ्या साहित्यिक तरुणांसाठी, कलावंतांसाठी, माझ्या परीनं त्यांना देईन. एवढचं या निमित्तानं सांगतो.                                                                                                                                                                                                                                                                                                                        - कवीवर्य ना. धों. महानोर

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारartकलाmusicसंगीतDeathमृत्यूfarmingशेती