... अन् यंत्रणाही लागली कामाला
By Admin | Updated: January 16, 2016 02:44 IST2016-01-16T02:44:29+5:302016-01-16T02:44:29+5:30
उद्योगनगरीत भरलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रथंदिडीने सुरुवात झाली. ग्रंथदिंडीने सुरू झालेला हा सारस्वतांचा सोहळा शेवटच्या दिवसापर्यंत निर्विघ्न पार
... अन् यंत्रणाही लागली कामाला
- सचिन देव, पिंपरी
उद्योगनगरीत भरलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्रथंदिडीने सुरुवात झाली. ग्रंथदिंडीने सुरू झालेला हा सारस्वतांचा सोहळा शेवटच्या दिवसापर्यंत निर्विघ्न पार पडावा, यासाठी पोलीस दल, अग्निशामक, आरोग्य विभागांसह स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही सज्ज आहेत.
संमेलनस्थळी सकाळपासून महिला व पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून साहित्यरसिक येत असल्याने संमेलनस्थळाला सकाळपासूनच यात्रेचे स्वरूप आले होते. संमेलनस्थळी प्रवेशद्वाराजवळच मेटल डिटेक्टर ठेवण्यात आले असून, प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूलाच पोलीस कक्ष तयार करण्यात आला आहे. संमेलनाला येणाऱ्या नागरिकांना पोलीस कर्मचारी आपुलकीने मार्गदर्शन करत आहे. ‘वॉकीटॉकी’द्वारे एकमेकांशी संपर्कात आहेत. नागरिकांना आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. संमेलनस्थळी जाणाऱ्या सर्व मार्गांवर वाहतूक पोलीस
तैनात असून, वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी सतत वाहनधारकांना सूचना देत आहेत. वरिष्ठ अधिकारी दिंडीसोबत पायी चालताना दिसून आले.